Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भविष्यफल २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २0१२

वेबदुनिया
WD
मेष : समाजात मानसन्मान, आदरसत्कार होईल. सामाजिक पत उंतावेल. जवळचे प्रवास सुखाचे होतील. अधिकारावर असणार्‍या स्त्री व्यक्तीकडून आपले लांबलेले काम होईल. कुटुंबातील स्त्रीयांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. दैनंदिन जीवनातील कामे विलंबाने घडून येतील. आपल्या जबाबदार्‍या पार पाडण्याचा प्रयत्न करा. संशोधनपर अभ्यासक्रमात यश लाभेल. लेखक, साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. आपल्या संभाषणचातुर्याच्या जोरावर मोठे ध्येय गाठाल. शुभदिनांक २८, २ ९

वृषभ : रेंगाळलेली कामे विना सायास मार्गी लागीतल. चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल. संतांचा सहवास लाभेल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. कामानिमित्त प्रवास घडून येतील. ज्या बातमीची अगदी अतुरतेने वाट पाहात होतात ती समजल्यामुळे आपल्या उत्साहाला उधाण येईल. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तू, महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळावेत. आपल्या मतांचा आदर केला जाईल. शुभदिनांक ३0.

मिथुन : प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. एखादा निर्णय अनपेक्षितपणे झटपट घेतला जाईल. व भविष्यात त्याचा उपयोग होईल. सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. व्यावसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल. वरिष्ठ पदावर काही काळ काम करण्याची संधी मिळेल. मनाजोग्या ठिकाणी बदली होईल. शुभदिनांक २७, २८.

कर्क : विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. आपल्या मतांचा आदर केला जाईल. जनसंपर्कातून चांगला फायदा होईल. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. अंध:श्रद्धेला बळी पडू नका. आपल्या वृत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. व्यवसायात जवळच्या नातेवाईकांना सहभागी करून घेणे शक्य असेल तर जरूर करा. नव्या कामाचा प्रस्ताव येईल. शुभदिनांक २६.

सिंह : पूर्व नियोजित कामात काही कारणांनी बदल करावा लागेल. आपल्या इच्छा, अपेक्षा पूर्ण होऊन कृतीत येतील. गुंतवणुकीतून लाभ होतील. स्पर्धा परीक्षांतून विद्यार्थ्यांना चांगले यश लाभेल. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. मन:स्वास्थ लाभेल. मित्रपरीवाराचे चांगले सहकार्य लाभेल. सुग्रास भोजनाचे योग येतील. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे बेत आखले जातील. पाहुण्यांची वर्दळ वाढेल. शुभदिनांक ३१, १.

कन्या : कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल. सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. नवपरिणितांना गोड बातमीची चाहूल लागेल. धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातून प्रगती साधता येईल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. नवीन वाहन खरेदी, वास्तू खरेदीचे प्रस्ताव मार्गी लागतील. शुभदिनांक २९, ३0.

तूळ : जोडधंद्यातून तसेच गृहउद्योगातून चांगली अर्थप्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी निव.ड झाल्यामुळे परगावी जाण्याचे योग येतील. समाजात आपली लोकप्रियता वाढेल. थोरा-मोठय़ांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आठवड्याच्या सुरुवातीलाच लक्ष्मीचा वरदहस्त लाभल्यामुळे आपण आनंदात राहाल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. कुटुंबात शुभकार्य घडल्यामुळे मनाला आनंद मिळेल. अनपेक्षितपणे आप्तस्वकियांच्या गाठीभेटी आनंद मिळवाल. शुभदिनांक २८.

वृश्चिक : गृहसौख्याचा आनंद लुटाल. गृहसुशोभिकरणासाठी आकर्षक, शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. कौटुंबिक जबाबदार्‍या स्वीकाराल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. आपल्या मताशी ठाम राहीलात तर परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे जाईल. शेजारी व जवळच्या नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध राहतील. धाडसी निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. शुभदिनांक २६,२७.

धनू : आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्याला नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्याकरीता सतत प्रयत्नशील राहाल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपल्या मतांचा आदर केला जाईल. राशीच्या व्ययस्थानातून होणारे चंद्रभ्रमणामुळे काही महत्त्वाचे निर्णय न घेतल्याने आपल्या हातून चांगल्या संधी निसटून जाण्याची शक्यता राहते. कोणी तुम्हाला संधी आणून देईल वाट पाहू नका, तर तुम्ही स्वत:च संधी निर्माण करुन आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. शुभदिनांक २९, ३0.

मकर : आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. व्यवसाय-उद्योगातील आत्मविश्‍वास व कामाचा वेग वाढेल. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला लाभ घडून येईल. रचनात्मक कामातून लाभ होतील, विश्‍वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. लाभस्थ चंद्राचे भ्रमण आपली इच्छापूर्ती करणारे आहे. समाजात आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत रहाल. आपल्या मतांचा आदर होईल. शुभदिनांक ३ १.

कुंभ : कुसंगतिपासून दूर राहावे. आपल्या इच्छा, आकांक्षा स्वत:च्या काबूत ठेवाव्यात. आपल्या प्रतिष्ठेला, प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे. व्यवसायातील कामातील सरकारी परवाने हाती येतील. सरकारी नोकरीत असणार्‍यांना चांगले लाभ होतील. आपल्या राशीच्या दशमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणा.र्‍या तरुणांना सुसंधी लाभतील. व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविता येतील. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला लाभ घडून येईल. शुभदिनांक २८, २९.

मीन : तरुणांना अनेक सुसंधींचा लाभ घेता येईल. गुप्तवार्ता कानी येतील. आत्मोन्नतीचा मार्ग सापडेल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटीतून सुखसमाधान लाभेल. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. नवनवीन उपक्रम राबविण्यात यश येईल. आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण कामानिमित्त परदेश प्रवास घड वून आणेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल. शुभदिनांक २८.
सर्व पहा

नवीन

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

गंभीर आजारांपासून मुक्त राहण्यासाठी अश्वत्थ स्तोत्राचे पठण करा Ashwattha Stotram

Paush Putrada Ekadashi 2025: पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

श्री कृष्ण कवच

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार