Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक भविष्य 4 जून ते 10 जून 2012

वेबदुनिया
सोमवार, 4 जून 2012 (13:52 IST)
WD
मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. कर्तुत्वशक्ती वाढेल्याने धाडसी कामे कराल. गुंतवणूकीतून लाभ होतील. नोकरीत अधिकार व सत्ता वाढेल. नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. शुभदिनांक ५,६.

वृषभ : जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. उत्तरार्धात नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. शुभदिनांक ३,४.

मिथुन : जनसंपर्कातून चांगला फायदा होईल. महत्वाचे निर्णय शांत विचारपूर्वक घरातील मोठ्या व्यक्तिच्या सल्याने घेणे आवश्यक आहे. मन सैरभैर होईल. शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील. धार्मिक - आध्यात्मिक प्रगती साधता येईल. षष्ठस्थानातून राहूवरुन होणारे चंद्राचे भ्रमण सामाजिक प्रतिष्ठा वाढविणारे आहे. व्यवसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. शुभदिनांक ६.

कर्क : तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील राहाल. नवोदीत कलाकारांना चांगल्या संधींचा लाभ घेता येईल. विरोधकांना आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. जुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. शुभदिनांक ८,९.

सिंह : आपली सामाजिक, राजकीय प्रतिष्ठा उंचावेल. व्यवसाय उद्योगातील उधारी उसनवारी वसूल होईल. आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. आपल्याला मताचा समाजात आदर होईल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आपल्या व्यवसायात जवळच्या नातलगाला सहभागी करुन घ्याल. शुभदिनांक ९.

कन्या : नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील.मित्र परिवाराची भेट होईल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. पूर्वी भावंडांशी झालेले मतभेद आपण गोड बोलून नाहिसे कराल. आपले अंदाज अचूक ठरतील. शुभदिनांक ८,९.

तूळ : आपला आत्मविश्‍वास व मनोबल उंचावेल. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकारावी लागेल. कामानिमित्त परदेशप्रवास घडून येण्याची शक्यता राहते. आपल्या राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक उत्कर्ष करणारे राहील. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे. स्वकष्टाचा पैसा मिळेल. तसाच खर्चही वाढेल. शुभदिनांक ९.

वृश्चिक : आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. व्यवसाय-उद्योगातील आत्मविश्‍वास व कामाचा वेग वाढेल. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून लाभ होतील. आपल्याच राशीतून होणारे चंद्राचे भ्रमण आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटविणारे राहील. नवीन परीचयातून लाभ होतील. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. त्यातूनच समाजात नांवलौकिक वाढेल. शुभदिनांक ३,४.

धनु : सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद लुटाल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. गुंतवणूकीतून लाभ होतील. स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्याकरीता सतत प्रयत्नशील राहाल. आपले मनोधैर्य वाढेल. आठवड्याच्या सुरुवातीला व्ययस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमणामुळे अचनाक अनावश्यक खर्च उद्भवतील. कामानिमित्तच्या घडणार्‍या प्रवासात अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. शुभदिनांक ५,६.

मकर : अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल. विश्‍वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. आपल्या हौसेमौजेखातर खर्च कराल. सहलीत सहभागी व्हाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनातील कल्पना आकारात घेतील. शुभदिनांक ९.

कुंभ : परस्पर संबंध दृढ होतील. नोकरीत अधिकारी आणि घरात पित्याचे सहकार्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. दुसर्‍यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. काही बाबतीत आपल्याला चांगला दिलासा मिळणार आहे. दशमस्थ चंद्राचे भ्रमण तरुणांच्या कर्तृत्वाला चांगला उजाळा देणारे राहील. उद्योग व्यापारात नवीन काही प्रकल्प, योजना करण्यास चांगला काळ आहे. शुभदिनांक ९.

मीन : आपल्या इच्छा आकांक्षांची पूर्तता होईल. व्यावहारिक स्पर्धेत आपण आग्रेसर राहणार आहात. वास्तु विषयक कामांना सुरुवात होईल. महत्वाचे निर्णयात योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन लाभेल. नवीन व्यवसायासाठी भांडवल गोळा करण्यात यश येईल. भाग्यस्थ चंद्राचे भ्रमण तीर्थस्थळांना भेटी घडवून आणेल. हातून सत्कर्म घडेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. नव्या आशा पल्लवीत होतील. शुभदिनांक ४.
सर्व पहा

नवीन

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर

आरती सोमवारची

देवासमोर काढा वाराप्रमाणे रांगोळी

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

Show comments