Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशी भविष्यफल

वेबदुनिया
WD
मेष
विरोधकांचा त्रास जाणवेल. व्यवसायात जवळच्या नातेवाईकांना सहभागी करून घेणे शक्य असेल तर जरूर करा. नव्या कामाचा प्रस्ताव येईल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. विवाहेच्छुक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. घरात मंगलकार्याची नांदी होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. स्पर्धापरीक्षांतून विशेष यशप्राप्ती होईल.शुभदिनांक २४,२५.

वृषभ
व्यवसायातील आत्मविश्‍वास व कामाचा वेग वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील. साचेबद्ध जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. अचानक सहलीचे आयोजन केले जाईल. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे बेत आखले जातील. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटी होतील. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल.
शुभदिनांक २ ७.

मिथुन
आपली सामाजिक, राजकीय प्रतिष्ठा उंचावेल. व्यवसाय उद्योगातील उधारी उसनवारी वसूल होईल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. आपले अंदाज अचूक ठरतील. आपले मनोबल वाढणार्‍या घटना घडतील. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. अचनाक सामाजिक क्षेत्रातून सहलीचे बेत आखले जातील.
शुभदिनांक २९,३0

कर्क
अनपेक्षित धनलाभ झाल्याने आश्‍चर्याचा धक्का बसेल. शेजार्‍यांचे सहकार्य लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. समाधान लाभेल. जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा. पराक्रमातील मंगळ-शनि धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करतील. आपल्या मतांचा समाजात आदर केला जाईल.
शुभदिनांक २६.

सिंह
आपले ध्येय साध्य करता येईल. सामाजिक कार्यात आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल. समाजात आपल्या मतांचा आदर होईल. परंतू आपल्या परखड वक्तव्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडून येतील. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. आपल्या कतृत्वाला चांगला वाव मिळेल.
शुभदिनांक २४ ते २६.

कन्या
आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आपले ध्येय गाठण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.
शुभदिनांक २७,२ ८.

तूळ
आपल्या इच्छा आकांक्षांची पूर्तता होईल. आत्मविश्‍वास वाढवणार्‍या घटना घडतील. एखादी गोष्ट आपण निश्‍चित करु शकू हा विश्‍वास वाटेल. नवीन कल्पना आकार घेतील. सरकार दरबारी असलेल्या कामास विलंब होण्याची शक्य आहे. मन सैरभैर होणार्‍या घटना घडतील. उत्तरार्धात घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल.
शुभदिनांक ३0.

वृश्चि क
एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकारावी लागेल. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. त्यातूनच समाजात नांवलौकिक वाढेल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. गुंतवणूकीतून लाभ होतील. कामाची आखणी नियोजनबद्ध केल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष साधता येईल.
शुभदिनांक २४,२५.

धन ु
योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल.
शुभदिनांक २६.

मक र
पूर्वनियोजित प्रवासात काही कारणाने विलंब होण्याची शक्यता आहे. स्वावलंबी राहा. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. आत्मपरीक्षणाचा आपल्याला खूप फायदा होईल. आपल्या मतांचा आदर केला जाईल. भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणे शक्य होईल.
शुभदिनांक २८,२९.

कुं भ
सरकार दरबारी असलेल्या कामास विलंब होण्याची शक्य आहे. मन सैरभैर होणार्‍या घटना घडतील. दुसर्‍यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. तब्येतीविषयी डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करुन घ्या. विश्‍वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात घेतील. उत्तरार्धात दार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येतील.
शुभदिनांक २५,२ ६.

मीन
यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत. व्यावसायिक उपक्रम डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविले जातील. नव्या आशा पल्लवीत होतील. आपले तत्व सोडू नका. नवीन व्यावसायिक कार्यारंभ केले जातील. आव्हानात्मक कामे स्वीकाराल. व्यवसाय उद्योगातील अनुत्तरीत प्रश्न सुटतील.जोडीदाराशी सुसंवाद साधा, म्हणजे वादंग उद्भवणार नाहीत.
शुभदिनांक २७,२८.
सर्व पहा

नवीन

शाकंभरी नवरात्र 2025 मध्ये कधी सुरू होईल, काय आहे त्याचे महत्त्व?

Guru Gobind Singh Jayanti 2025 गुरु गोविंद सिंग यांची पाच उद्दिष्टे

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

Guru Govind Singh jayanti : गुरु गोविंद सिंह यांच्याबद्दल खास गोष्टी

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

Show comments