Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहित भविष्यफल

वेबदुनिया
सोमवार, 30 जुलै 2012 (13:04 IST)
WD
मे ष : नेत्रविकार, उष्णतेचे विकार यांच्यापासून त्रास होण्याची शक्यता आहे. नवनवीन कल्पना आकार घेतील. व्यवसाय उद्योगात नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. आपल्या कर्तृत्त्वाला झळाळी येणार्‍या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान लाभेल. काही बाबतीत आपल्याला चांगला दिलासा मिळणार आहे. शुभदिनांक १, २.

वृष भ : नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या अनिश्‍चितता जाणवेल. आपली मते डळमळीत ठेवू नका. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. एकमताने निर्णय घ्याल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. प्रतिस्पध्र्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. शुभदिनांक २९, ३0.

मिथु न : आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.भागीदारीत व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांनी मात्र सतर्कतेने निर्णय़ घेणो गरजेचे आहे. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. थोरा-मोठय़ांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणे मंजूर होतील. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. शुभदिनांक ३, ४.

कर् क : विवाहेच्छुक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. घरात मंगलकार्याची नांदी होईल. समोर आलेल्या संधीचा फायदा घ्या. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना मनाजोगे काम मिळेल. प्रतिस्पर्ध्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या अनिश्‍चितता जाणवेल. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. तब्येतीची काळजी घ्या. मानसिक थकवा जाणवेल. कामात अडथळे येण्याती शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल.शुभदिनांक ३0.

सिं ह : सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. नवी दिशा सापडेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. पुढे घडणार्‍या घटनांची आपल्याला चाहूल लागेल. दशमस्थ चंद्राचे भ्रमण तरुणांना नोकरीत सुसंधी देणारे राहील. व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविता येतील. आशावादी धोरण स्वीकाराल. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. रेंगाळलेली कामे विना सायास मार्गी लागीतल. शुभदिनांक ३0, ३१.

कन्य ा : कौटुंबिक जबाबदार्‍या स्वीकाराल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, राहील. कामानिमित्त प्रवास घडतील. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल. आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. व्यवसाय-उद्योगातील आत्मविश्‍वास व कामाचा वेग वाढेल. धाडसी निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. शुभदिनांक ३१.

तू ळ : घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता इलेक्टॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. स्वत:च्या कल्पना शक्तीच्या जोरावर मोठी प्रगती साधाल. वैयक्तीक बाबतीत निष्काळजीपणा टाळा. आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवाल. उधारी उसनवारी टाळावी. शुभदिनांक ३0.

वृश्चि क : घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन खरेदीचे मनसुबे महिला आखतील. गृहसौख्याचा आनंद लुटाल. स्थावर मालमत्तेचे व्यवहार मार्गी लागतील. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीतून आनंद मिळवाल. आपल्याच राशीतून होणारे चंद्रभ्रमण आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी देणारे राहील. सकारात्मक विचारांचा फायदा होईल. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. शुभदिनांक २९.

धनू : नवीन जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. कार्यक्षेत्रातील प्रशिक्षणाच्या निमित्ताने परदेशी संस्थांशी संबंध येतील. समाजात आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत रहाल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मनाचा उत्साह कमी पडण्याची शक्यता आहे. व्यवसायातील अडचणींना तोंड द्यावे लागेल. शुभदिनांक ३१.

मकर : आपल्या दूराग्रही स्वभावाला आळा घालावा. पूर्वी झालेली दिशाभूल निस्तरण्यात वेळ जाईल. महत्त्वाच्या निर्णयात वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. सरकार दरबारी चांगला नावलौकिक लाभेल. आपली रेंगाळलेली कामे यशस्वीपणे पूर्ण झाल्याने समाधान लाभेल. भविष्यकाळाच्या दृष्टीने आर्थिक तजवीज करणे शक्य होईल. अनुत्तरीत प्रश्नावर चर्चेने मार्ग सापडतील. आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवाल. उधारी उसनवारी टाळावी. शुभदिनांक १, २.

कुं भ : वरीष्ठांच्या सल्ल्यानेच कामे मार्गी लावा. नोकरीत मनासा.रख्या घटना घडतील. उत्साह वाढेल. सरकारी दरबारी रेंगाळलेल्या कामात यश मिळेल. नवीन ओळखी होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. आपल्या राशीच्या दशमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविता येतील. आशावादी धोरण स्वीकाराल. शुभदिनांक ३, ४.

मी न : नव्या उमेदीने कामाला सुरुवात कराल. व्यवसाय उद्योगात आपणास विरोध करणार्‍या व्यक्तींकडून लाभ होतील. मेहनतीचे चीज झाल्याने समाधान लाभेल. विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. स्वतंत्र विचारांची आवश्यकता आहे. परदेशी जाण्याचा प्रयत्न करणार्‍या संधी उपलब्ध होईल. नव्या कामात अपेक्षित यश मिळेल. आव्हानात्मक कामातून यशस्वी व्हाल. धाडसी निर्णय घेतले जातील. शुभदिनांक ३0.
सर्व पहा

नवीन

शाकंभरी नवरात्र 2025 मध्ये कधी सुरू होईल, काय आहे त्याचे महत्त्व?

Guru Gobind Singh Jayanti 2025 गुरु गोविंद सिंग यांची पाच उद्दिष्टे

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

Guru Govind Singh jayanti : गुरु गोविंद सिंह यांच्याबद्दल खास गोष्टी

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

Show comments