Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑक्टोबर (2013) महिन्याचे भविष्यफल!

वेबदुनिया

मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)

WD

या महिन्यात कोणतेही काम करण्याआधी नीट विचार करा. तब्येतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मित्रांच्या मदतीशिवाय यश मिळणे सोपे नाही, यासाठी त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. देवाची आराधना करा, यामुळे आपले चित्त शांत राहील आणि येणारे कष्ट त्रासदायक ठरणार नाहीत.


वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

WD

या महिन्यात काहीतरी खास होणार आहे. राजकारणातली आवड उच्च स्थानावर पोहोचायला साहाय्यभूत ठरेल. स्पर्धेत यश मिळेल, साहित्य, संगीतातील आवडीचा फायदा होईल. तब्येतीची काळजी घ्या. महिन्याच्या पूर्वार्धात खर्च अधिक होईल, ज्यामुळे धन संचयात अडचण निर्माण होईल. चांदीच्या तांब्यात वाहत्या नदीचे पाणी भरून ठेवल्यास फायदा होईल.

मिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा)

WD

थोडा कठिण काळ आहे. आपण कार्यक्रमांप्रती अरूची अनुभव कराल. मेहनत केली तरी फळ न मिळाल्यामुळे आलेल्या उदासीने तुमचे मन चिंतित राहू शकेल. अति विश्वासाच्या बदल्यात तुम्हाला धोका मिळू शकतो. मोठ्या व्यक्तीशी संपर्क. घरातील लोकांबरोबर मनोरंजन होईल. वेळ वाया घालवू नका. व्यापारात प्रगति होईल.

कर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो)

WD

अडलेली कामे मार्गी लागतील. समवयस्क लोकांसोबत प्रेमभाव वाढेल. नोकरीचे नवे योग जुळत आहेत. ऑफिसमध्ये कोणीतरी तुमच्याविरुद्ध कट रचत आहे, सावध राहा. मैत्री प्रेमात बदलण्याचे संकेत आहेत. विश्वास ठेवा, सर्व काही चांगले होईल. विशेष भाग्यवर्धक कामांचा योग. कर्मक्षेत्रात यात्रेमुळे नवीन कामांमध्ये यश. कलात्मक क्षेत्रात विशिष्ठ योग.


सिंह (मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे)

धर्म, आध्यात्मिक व्यक्तित्वच्या व्यक्तीचा सन्मान, प्रसिद्धि. वरिष्ठांची कृपा दृष्टि राहील. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्णहोतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल. दीर्घ प्रवास विशेष फायदेशीर ठरणार नाही. आरोग्यही ठीक राहणार नाही. नोकरदार लोकांना आपल्या सह-कर्मचारींच्या कट-कारस्थानांचा सामना करावा लागेल.

कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो)

WD

तुमच्या जीवनात मोठी उलथापालथ होणार आहे. नवीन कामांसाठी धावपळ होईल. धर्म, आध्यात्मासाठी विशेष मंगल यात्रा योग. भागीदारीतून विशेष लाभ प्राप्तिचा योग. मित्र तुम्हाला मदत करण्यासाठी कायम तत्पर राहतील. सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश मिळू शकेल. सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग. मुलांकडून सुखद समाचार प्राप्त होतील. शुभ संदेश नवी दिशा देईल. पारिवारिक समस्यांवर लक्ष द्या.

तूळ (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते)

WD
जीवनात प्रगती करण्यासाठी आपल्याला सहाय्याची गरज आहे. उच्च पदावर असलेल्या एखादा व्यक्क्तीसाबतच्या तुमच्या खाजगी ओळखीचा तुम्हाला लाभ होईल. धंदयात नवे दरवाजे तर उघडतील, पण या संधीसाठी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. वाहन वगैरे चालवताना जरा सावधानी बाळगा. शिक्षा, मुलांसंबंधी कामे होतील. उपलब्धि प्राप्तिचा योग. पद, प्रतिष्ठा मिळेल. सामिजिक कामात यश.

धनु (ये, यो, भ, भी, भू, धा, फा, ढा, भे)

WD
नव्या महिना आनंद घेऊन येणार आहे, त्याचे स्वागत करा. नोकरदार लोकांना चांगली बातमी कळेल. व्यापारी वर्गाला लाभ होईल. जीवनात नवा उत्साह संचारेल. शत्रूंवर विजय मिळवाल. वैवाहिक जीवन सुखद जाईल. जोडीदार तुमच्यासाठी ढालीसमान सिद्ध होईल. तुम्हाला तुमच्या चंचल मनावर नियंत्रण मिळवायला हवे, नाहीतर काही अडचणींचा सामना करावा लागेल.

मकर (भो, जा, जी, खी, खू, खे, गो, गा, गी)

WD

महिन्याची सुरुवात चांगली होणार आहे. जुन्या कर्जांपासून सुटका मिळेल. वृत्ती स्थिर झाली की मागोमाग समाधान येते. तुमचे निर्णय योग्य असल्याचे दिसून येईल. सार्मथ्यात वाढ होईल. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. विद्यार्थ्यांना अध्ययनात छान यश. कलाक्रीडाक्षेत्रातही छान प्रगती. अपत्याकडून चांगली बातमी समजेल. सासरकडून सुखद बातमी कळू शकते. नोकरी बदलण्याचे योग आहेत.

कुंभ (गू, गे, गो, सा, सि, सु, से, सो, द)

WD

गेलेली संपत्ती पुन्हा मिळवता येईल. परंतु गेलेली वेळ? म्हणूनच वेळेचा जास्तीत जास्त चांगला वापर करा. तसे केलेत तर छान प्रगती. इतरांची मने जिंकून घ्याल. विरोधकांच्या हालचालीवर नजर ठेवावी लागेल. तब्बेतीच्या पूवीर्च्या तक्रारी दूर होतील. तत्त्वज्ञानाइतकेच व्यवहारज्ञान श्रेष्ठ. या ज्ञानाचा उपयोग करून परिस्थितीवर मात करा. बुध-शुक्र प्रसन्न. पूवीर्च्या चुका सुधारण्याची संधी.

मीन (दी, दू, थ, झ, य, दे, दो, ची)

WD
या महिन्याच्या सुरुवातीला समस्यांचा सामना करावा लागेल. मित्रांच्या भेटी. दोस्ती अधिक घट्ट होईल. भरपूर खर्च करण्याएवढा पैसा येईल. महिलांच्या लक्षामुळे घरात सुख. आरोग्य ठीक. उत्साह राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण करा. राजकारणात नवीन डावपेच लढवा. खर्चही खूप. व्यवहारी राहा. कामात वाढ. त्याचा परिणाम आरोग्यावर.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नवीन

Panchak 2025 फेब्रुवारीमध्ये या तारखेपासून दोषमुक्त पंचक सुरू, अशुभ काळ किती काळ टिकेल जाणून घ्या

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी Essay On Chhatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विचारले जाणारे प्रश्‍न

श्री गजानन महाराज पादुका पूजन विधी

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

Show comments