Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑगस्ट महिन्याचे मासिक भविष्यफल

वेबदुनिया

मेष

WD

तब्येतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मित्रांच्या मदतीशिवाय यश मिळणे सोपे नाही, यासाठी त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. देवाची आराधना करा, यामुळे आपले चित्त शांत राहील आणि येणारे कष्ट त्रासदायक ठरणार नाहीत. शत्रू आपले अहित करण्यात सफल ठरू शकतात. जोडीदारासोबत बाचाबाची होऊ शकते. आर्थिक दॄष्ट्याही हा महिना लाभदायक नाही - विशेषकरून महिन्याच्या शेवटी. सुदैवाने भेटलेल्या एखाद्या व्यक्तीमुळे जीवनाला नवी दिशा मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. मित्र आणि नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.


वृषभ

WD

आपले नवे घर बनू शकते. व्यापारात गती सामान्य राहील. राजनैतिक क्षेत्रात आपले वर्चस्व वाढू शकेल. विरोधक आपल्यासमोर मात खातील. हो, फालतू कायदेशीर प्रकरणात फसण्यापासून वाचा. थोड्या विशेष व्यापारी वर्गाला लाभ होऊ शकेल. नशीब बलवत्तर आहे. नवे वाहन खरेदी करू शकता. प्रेमाच्या दॄष्टीने महिना चांगला आहे. एखाद्या जुन्या मित्राची अचानक भेट होणे शक्य आहे. ही भेट फायदेशीर ठरेल. जुन्या दुर्धर आजारापासून सुटका मिळण्याचा योग आहे. कोणालाही उधार देण्यापासून सावध राहा, नाहीतर ते परत मिळवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील.


मिथुन

WD

या महिन्यातही स्थिती चांगली नसेल. नियोजीत कार्यक्रमानुसारच कामे करा. कौटुबिक प्रश्न भेडसावू शकतात, खासकरून स्त्रियांना. आपल्या धर्मस्थळात जाऊन प्रार्थना करा. महिन्याचा शेवट येता-येता चांगल्या परिस्थितीची सुरुवात होईल.
आपला वाईट काळ संपला आहे. जुन्या कामाचा फायदा मिळण्यास सुरुवात होईल. आपण नव्या कामाचा शुभारंभही करू शकता. मित्र आपल्याला मदत करतील. हो, पण कोणावरही डोळे मिटून भरवसा ठेवू नका, नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची पाळी येईल. आणि हो, कुटुंबात लहान-मोठ्या समस्या उद्भवू शकतात. पण आर्थिक बाजू मजबूत राहील.


कर्क

WD

पार्टी देण्याची तयारी ठेवा, महिन्यापासून अडकलेले काम मार्गी लागेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. सासरच्या लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवा. व्यापारी वर्गाला विशेष लाभ होईल. जग आपल्या कामाचे कौतूक करेल. मानसन्मानात वाढ होईल. प्रपंचातही सर्वकाही ठीकठाक राहील. विद्यार्थ्यांसाठीही निकाल अशादायक असतील. घरात नव्या पाहुण्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. नव्या लोकांवर डोळे मिटून भरवसा ठेवू नका. जुन्या समस्या नव्या रुपात तुमच्यासमोर उभ्या ठाकतील. मित्रांसोबत मिळून नव्या कामाची सुरुवात करू शकता. नोकरीतही आपल्याला पदोन्नती मिळू शकते.

सिंह

WD

लक्षात असू द्या वाणीच मित्र आणि शत्रू बनवते, म्हणून तिचा वापर विचारांती करा. स्त्री वर्गासाठी हा महिना फारच शुभ आहे. शत्रुच्या गुप्त कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे. फार परिश्रम करावे लागतील. तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे निकाल उत्तम असतील. महिन्याची सुरूवात तर चांगली असेल, पण महिन्याच्या शेवटी काही समस्या भेडसावू शकतात. दीर्घ यात्रा फायदेशीर तर असतील पण यासाठी अधिक पैसेही खर्चावे लागतील. शत्रू आपल्याला त्रास देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतील पण त्यांना यश येणार नाही.

कन्या

WD

नो प्रॉफीट नो लॉस, हा महिना अशा प्रकारचा असेल. भौतिक गरजेच्या वस्तू खरेदी कराल. फिरण्यावर आणि मनोरंजनावर अधिक खर्च कराल. शत्रुंपासून सावध राहा. जर आपल्या डोक्यावर कर्ज असेल तर या महिन्यात ते फ़ेडून टाकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जी कामं केवळ डोक्यातच कल्पनेच्या स्वरूपात होती ती आता वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. ही आपल्या यशोगाथेतील एक मोठी झेप ठरेल.

तूळ

WD

महिन्यात काहीतरी खास होणार आहे. राजकारणातली आवड उच्च स्थानावर पोहोचायला साहाय्यभूत ठरेल. स्पर्धेत यश मिळेल, साहित्य, संगीतातील आवडीचा फायदा होईल. तब्येतीची काळजी घ्या. महिन्याच्या पूर्वार्धात खर्च अधिक होईल, ज्यामुळे धन संचयात अडचण निर्माण होईल. चांदीच्या तांब्यात वाहत्या नदीचे पाणी भरून ठेवल्यास फायदा होईल. ललित कलेत रूची वाढेल, पाहुण्यांच्या आगमनाने आनंद होईल. ठरवलेले काम मोठ्या मुष्किलीने होईल, अधिकारींसोबतची जवळीक टाळा. उदरनिर्वाहासाठी आपापल्या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना आपल्या सहकारी लोकांसोबत जुळवून घेणे आवश्यक ठरेल. आपण आपल्या पराक्रमाने परिस्थितीला सकारात्मक बनवण्यात सफल व्हाल.


वृश्चिक

WD

कुटुंबीयांच्या साहाय्याने जीवनात आनंद निर्माण होईल. पैशाचा अपव्यय टाळा. बाहेर फिरायला जाण्याचा कार्यक्रम बनू शकतो. शिक्षणाच्या क्षेत्रात विध्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढू शकते. प्रेम संबंध मजबूत होतील. व्यापारात लाभ आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. नोकरीत पदोन्नती आणि व्यापारात वृध्दीचे योग आहेत. हिंडण्या-फिरण्याची संधी मिळेल, पण तितकेच थकायलाही होईल. चांगल्या बातमीने मन खुश होईल, पण अधिक भावनिक होऊ नका. विद्यार्थी वर्गाला एकाग्र चित्त होण्यासाठी अतिशय मेहनत करावी लागेल.

धनु

WD

हा महिना आपल्याला अधिकतर ठीकठाक ठरेल. व्यापारात नव्या युक्त्यांचा फायदा होईल. भावुक होणे चांगले आहे, पण अती भावनिकता टाळा. सुख आणि धन प्राप्तीचे संकेत आहेत. सांध्यांचे दुखणे किंवा शल्य चिकित्सा होऊ शकेल. नोकरी व्यवसायात परिवर्तनामुळे घरापासून दूर राहावे लागेल. स्पर्धेचा निकाल आपल्याला प्रसन्न करेल. स्त्रियांनी तब्येतीची काळजी घ्यावी. वजन वाढेल. नोकरीत पदोन्नती शक्य आहे. तब्येतही थोडी नाजुक राहील. विद्यार्थी वर्गासाठी चांगली बातमी आहे.


मकर

WD

आपल्या जीवनात नवा उत्साह आणि रंगांची उधळण होणार आहे. बहिणी-भावंडांचे साहाय्य जीवनात नवा आनंद निर्माण करेल. व्यापारात नवे यश आणि वृध्दी होईल. थांबलेली कामे मार्गी लागतील. लॉटरीने फायदा होईल. बदलत्या रुतुमानानुसार आपली तब्येत बिघडू शकते. दूरचे नातेवाईक आपल्याकडे येऊ शकतात. आपली जराशी बेपर्वाई आपल्याला हानीकारक ठरू शकते.


कुंभ

WD

सावध राहा, कोणीतरी आपल्याविरुध्द कट रचत आहे. हलकीशी चूक आपल्याला महागात पडू शकते. एका मांगलिक कार्याचा योग जुळत आहे. सकारात्मक वातावरण कायम राहील. फार मेहनत करावी लागेल. हो, त्यानुसार फळही मिळेल.
जीवनात चढ -उतार पाहायला मिळतील. एखादे काम घाई-गडबडीत करणॆ टाळा, नाहीतर तुमचेच नुकसान आहे. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. उगीचच वादात पडू नका. तब्येत ठीक राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.


मीन

WD

या महिन्यात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू बळकट राहील. नव्या खरेदीसाठी ही वेळ अनुकूल आहे. नवे लाभदायक संबंध प्रस्थापित होतील. धार्मिक कार्यात रूची वाढेल. वैवाहिक जीवन कडू-गोड राहील. विध्यार्थी वर्गाला अधिक मेहनत करण्याची आवश्यकता आहे. आपण कार्यक्रमांप्रती अरूची अनुभव कराल. मेहनत केली तरी फळ न मिळाल्यामुळे आलेल्या उदासीने तुमचे मन चिंतित राहू शकेल. अति विश्वासाच्या बदल्यात तुम्हाला धोका मिळू शकतो.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नवीन

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

सर्व पहा

नक्की वाचा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments