Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जुलै 2014 महिन्यातील राशीफल

Webdunia
शुक्रवार, 4 जुलै 2014 (13:15 IST)
मेष : राशी स्वामी मंगळ आपल्या राशीच्या षष्ठ स्थानातून १४ तारखेपर्यंत भ्रमण करणार आहे. त्यामुळे नोकरदारांना नोकरीत बदल शक्य,  मात्र जबाबदारी वाढेल. नोकरीत बदल जरूर असावा पण त्यात स्थैर्य असावे, नाही तर शेवटी पश्‍चातापाची पाळी येईल. कामाच्या ठिकाणी धावपळीचे वातावरण राहील. नोकरीत कर्तव्य करावे, इतरांना सुधारणा करण्यासंबंधी उपदेश देत बसू नये. काही प्रमाणात प्रकृतीच्या तक्रारींचा त्रास सहन करावा लागेल. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीत बदल घडविण्याची गरज आहे. शारीरिक वेदनांपासून स्वत:चा बचाव करा. गरज वाटल्यास डॉक्टर बदलण्यास मागे-पुढे पाहू नये. विरोधकांवर विजय मिळवाल. गुरू महाराज आपल्या राशीच्या सुख स्थानातून भ्रमण करणार आहेत. गृहसौख्य उत्तम राहील. कौटुंबिक कर्तव्य पूर्ण करा.

भावना आणि वैयक्तिक संबंधात संतुलन बनवून ठेवा. कौटुंबिक कलाहास कारणीभूत होणारे विषय टाळा. घरातील लोकांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. विद्यार्थी वर्गाला जास्त मेहनत घेण्याची गरज भासणार आहे. आपल्या शैक्षणिक क्षेत्रात सरावाचे धोरण अवलंबवावे लागेल. बुद्धिमत्तेस खतपाणी मिळेल असे खेळ जोपासा. आपल्या गुरुजनांच्या आदेशाचे पालन करा. वेळेचे बंधन पाळा. आपल्या आकलनशक्तीचा विकास करा. स्वकर्तृत्वावर विश्‍वास ठेवा. साहसी प्रयोग कटाक्षाने टाळा. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न करा. इतरांना सल्ले देणे टाळावे. प्रत्येक गोष्टींचा आस्वाद घेताना त्याचा अतिरेक होणार नाही ना याची काळजी घ्या. जोडीदारास दुखवू नका. गैरसमजुतींना थारा देऊ नका. जोडीदारास दाखविलेल्या स्वप्नांची पूर्तता करा. जोडिदाराचे हेकेखोर वागणे मानसिक तणाव वाढवेल. संशयावरून कोणतेही गैरसमज होण्याची शक्यता आहे. ते टाळण्याचा प्रयत्न करा. सर्व गोष्टी नशिबावर अवलंबून असतात असे म्हणत हात-पाय गाळून बसू नये. प्रयत्न करणे सरतेशेवटी आपल्याच हाती असते.

शुभ देवता : गणपती उपासनेला प्राधान्य द्या, मनातील इच्छा पूर्ण होईल.

शुभ रंग : लाल
वृषभ : गुरू महाराज आपल्या राशीच्या पराक्रम स्थानातून भ्रमण करणार आहेत. लहान भावंडाचे आपल्या विषयीचे कलूषित झालेले मत सुधारण्याची संधी मिळेल. लेखी व्यवहार अतिशय चांगल्याप्रमाणे यश देणार आहेत. शेजारी आपल्याविषयी चांगले मत राखून वागणार आहेत. आपल्याला कोणाला जामीन राहायला हरकत नाही. लाभ स्थानातील हर्षल-केतूचे भ्रमण जवळचे नातेवाईक तसेच मित्र परिवारांबरोबर जरा सबुरीने वागणे गरजेचे राहील. शक्यतो कोणत्याही प्रकारचे व्यसन आपल्याला लागणार नाही याची काळजी घ्या. मंगळ आपल्या राशीच्या प्रणय स्थानातून १४ तारखेपर्यंत भ्रमण करणार असल्याने प्रेमात काही प्रमाणात काळजी घ्यावी लागेल असे संकेत आहेत. प्रेमाची व्यक्ती तुटकपणे वागण्याची शक्यता आहे. स्वत:वर संयम ठेवा. प्रेम संबंधात कोणीही चुकू शकतो म्हणून आपल्या जोडिदराच्या चुका सौम्य शब्दात दाखवा. एकमेकांबद्दल विश्‍वासार्हता वाढवणे जरुरीचे आहे. प्रिय व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा योग्य मान राखा. कौटुंबिक जीवनात आनंदाची बातमी मिळेल. घरात मानप्रतिष्ठा सर्वांकडून मिळेल. घरातील वातावरण चांगले राहील. गैरसमज दूर होतील. घरातील सर्वांच्या मताचा आदर करा. मनात सकारात्मक भावना ठेवा. इतरांच्या बरोबर स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:च्या प्रगतीचा व कामाचा आढावा घ्या. विद्यार्थी वर्गाने प्रयत्नावरच भर द्यावा. आवश्यक असेल तरच दुसर्‍यांचा सल्ला घ्यावा. स्वप्नांचा पाठलाग करा पण शॉर्टकट कधीही घेऊ नका. वरिष्ठांशी मिळतेजुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. जबाबदारी अंगावर येऊन पडली तर ती टाळू नका. फाजील आत्मविश्‍वास बाजूस ठेवून योग्यवेळी योग्य धोरण राबवणे हिताचे ठरेल. हितचिंतकांच्या सल्ल्यांनी चांगले निर्णय घ्या. व्याप वाढवू नका.

घडलेल्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्यांचा विचार नको. काळानुसार बदलायला हवंच. मौल्यवान वस्तूखरेदी करताना काळजी घ्या. आत्मपरीक्षण करा म्हणजे पुढील चुका टळतील. विरोधकांना न दुखवता त्यांचे कर्तव्य त्यांना सांगावे लागेल.

शुभ देवता : देवीच्या उपासेनेला प्राधान्य द्या, मनातील इच्छा पूर्ण होईल.

शुभ रंग : क्रीम कलर
मिथुन : राशीस्वामी बुध आपल्या राशीत जवळपास महिनाभर राहणार असल्याने प्रचंड आत्मविश्‍वासाने कामे करण्याची संधी प्राप्त होणार आहे. उत्साह कमालीचा वाढेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. शुध्द व सात्त्विक आहारावर भर द्या. मानसिक स्वास्थ्यासाठी योगासने मेडिटेशनवर भर द्या. तब्बेत ठीक करण्यासाठी पहाटे मोकळ्या जागी फिरायला जा. गुरू महाराज आपल्या राशीच्या धनस्थानातून भ्रमण करणार आहेत. कर्जमुक्त होण्यासाठी सुसंधी मिळेल. पैशाची कामे मनाप्रमाणे होतील. व्यापारात आर्थिक व्यवहार करताना मन स्थिर ठेवा. पैसे वसुलीवर भर द्या. गुंतवणुकीकडे लक्ष ठेवा. देण्याघेण्याचे व्यवहार ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखालील करा. आपल्या व्यवहारात नियमांचे काटेकोर पालन करा. पैशांचे महत्त्व ओळखा. आपल्या गोड बोलण्याने सर्वांना आपलेसे करण्याची संधी आपल्याला प्राप्त होणार आहे.

आलेल्या संधीचा लाभ उचला. सरकारी कामे करताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. सरकारी परवाने मिळवण्यासाठी अतिशय अनुकूल असा कालावधी आहे. कर्मस्थानातील हर्षल केतूमुळे नोकरदारांना तसेच व्यावसायिकांना अतिशय सावधानता बाळगावी लागेल. नोकरी करणार्‍यांनी नवीन नोकरीच्या भानगडीत पडू नये, आहे त्या नोकरीत समाधान मानून रहावं. नोकरी सोडण्याच्या भानगडीत पडू नये, नोकरीत बदल करू नये. अंगावर महत्त्वाची जबाबदारी पडेल. सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने करा. त्यात चालढकल करू नका. देवघेवीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा. आपले स्थान बळकट करण्याचे प्रय▪करा. नवे व्यवसायात अकारण धाडसी निर्णय घेऊ नका. विवाहाची बोलणी करण्यापूर्वी आलेल्या स्थळाची नीट माहिती घेऊनच मग योग्य तो निर्णय घ्या. प्रेमामध्ये पत्रव्यवहार किंवा एसएमएस अतिशय जपून करा. कोणाच्या प्रभावाखाली जाऊन निर्णय घेऊ नये. दुसर्‍यांच्या चुका दाखवताना सौम्य शब्दात सांगा. शांत राहून परिस्थिती काबूत ठेवण्याचा प्रयत्न करा.

शुभ देवता : विष्णू उपासेनेला प्राधान्य द्या, मनातील इच्छा पूर्ण होईल.

शुभ रंग : मोरपिसी हिरवा
कर्क : गुरू महाराज आपल्या राशीतून भ्रमण करणार आहेत. सकारात्मक बाबी आपल्याला या महिन्यात पाहायला मिळणार आहेत. प्रवासामध्ये बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. आरोग्याच्या संवर्धनासाठी व्यायामाला खास प्राधान्य द्या. आहार-विहाराचे नियम पाळा. कर्तव्याचे पालन करताना आरोग्य संपत्तीचे संवर्धन करण्यात दक्ष राहा. अनारोग्यास आमंत्रण ठरेल, अशी दिनचर्या आखू नका. संततीसाठी प्रयत्न करणार्‍या विवाहित जोडप्यांना सकारात्मकता प्राप्त होईल. आलेल्या संधीचा लाभ घ्या. विद्यार्थी वर्गाला अभ्यासातील वक्तशिरपणा, सातत्य,  कठोर परिश्रम यामुळे यशाला प्रयत्नाचे फळ मिळेल. सूत्रबद्ध अभ्यासाने यशाचा आलेख उंचावेल.

आपल्या प्रगतीस चालना मिळेल. बौद्धिक मतभेद टाळा. अभ्यासातील शॉर्टकट टाळा. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने अभ्यासाचे दडपण कमी होईल. अभ्यासातील अडचणींवर बौद्धिकतेने मात करा. गुरूचा भाग्यस्थानातील हर्षलशी होणारा नवपंचम योग पाहता अध्यात्मिक क्षेत्रात मनासारखे यश प्राप्त होण्यास मदत होईल. अनोळखी लोकांशी व्यवहार करताना सावधानता बाळगा. लगेच त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नका. आयत्यावेळी उद्भवणार्‍या खर्चामुळे पैशाची कृतीवर जोर देणे इष्ट राहील. स्वत:च्या कामामध्ये आळशीपणा नको. खर्च काटकसरीने केलात तर चिंता करावी लागणार नाही. भावंडाबरोबर काही तडजोडी कराव्या लागतील. स्वत:ची आत्मप्रौढी मिरवणे टाळावे. आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहा. स्वत:च्या कामाबद्दल व कर्तव्याबद्दल व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारल्यास तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. तुमचे अभ्यासाचे क्षेत्र विशाल करण्याचे ठरवा. घेण्यापेक्षा देण्यात आनंद माना. वाहन चालविताना काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट फार न ताणता त्यातून सामंजस्याने कसा मार्ग काढता येईल याचा विचार करा. दुसर्‍यांना दोष न देता स्वत:चा आलेख उंचावण्याचा प्रय▪करा. प्रवासकाळात चीज वस्तूंची काळजी घ्या. कृती आणि योग्य निर्णय तुम्हास यश प्राप्त करून देतील. दुसर्‍यांवर विसंबून कामे करू नका.

शुभ देवता : शंकराच्या उपासनेला प्राधान्य द्या, मनातील इच्छा पूर्ण होईल.   

शुभ रंग : निळा
सिंह : राशीस्वामी रवि आपल्या राशीच्या लाभ स्थानातून १६ तारखेपर्यंत भ्रमण करणार आहे. नातेवाईक, मित्र परिवार यांच्याबरोबर वेळ घालविण्यासाठी चांगला कालावधी आहे. परंतु त्यांच्याबरोबर व्यवहार करताना सतर्कता राखणे गरजेचे आहे. त्यानंतर आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गरोदर महिलांनी योग्य ती काळजी घेणे हिताचे ठरेल. शारीरिक तक्रारीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्यांची गंभीरपणे दखल घ्या. चुकीच्या औषधोपचाराने त्रास संभवतो. अधूनमधून प्रकृतीच्या आवश्यक त्या तपासण्या करून घेणे हितावह आहे. संततीसाठी प्रयत्न करणार्‍या विवाहित जोडप्यांना अतिशय काळजी घ्यावी लागेल. संततीच्या समस्यांकडे गंभीरपणे लक्ष द्या. मुलांच्या काही ना काही आरोग्याच्या तक्रारी ऐकायला मिळतील. मुलांच्या हालचालीवर बारीक लक्ष द्यावे. गुरुचे आपल्या व्ययस्थानातील भ्रमण

आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करण्यास अनुकूलता दाखवणार आहे. दूरच्या प्रवासाचे बेत तडीस जाण्यास मदत करणार आहेत. प्रवासात नियोजन महत्त्वाचे ठरेल. प्रवासात चीज वस्तू सांभाळून असावे. कुटुंब स्थानात मंगळ भ्रमण करणार असल्याने कौटुंबिक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्तव्यपालनासाठी कौटुंबिक पातळीवर काही तडजोडी कराव्या लागतील. कौटुंबिक अस्वस्थता जाणवेल. कौटुंबिक कलह तडजोडीने मिटवावे. वादविवाद, कलह यापासून लांब राहा त्यामुळे घरात मतभेद कमी होतील. इतरांच्या मनात प्रेरणेची ऊर्जा निर्माण करण्यात पुढाकार घ्या. खुल्या दिलाने नवीन ओळखी करून घ्या. उगाच कोणतीही शंका मनात बाळगू नका. एखादी स्पर्धा, प्रवेश परीक्षा यांना सामोरे जा. झपाटून काम करण्याची क्षमता अंगी बाणा. लोकांना बालेण्यापेक्षा कृतीवर जास्त भर द्या. चिकाटी आणि प्रयत्न कमी पडू देऊ नका. तुमच्या प्रयत्नाची दिशा चुकणार नाही यांची काळजी घ्या. आपली ताकद आणि र्मयादा ओळखून वागा.

शुभ देवता : सूर्याच्या उपासनेला प्राधान्य द्या, मनातील इच्छा पूर्ण होईल.

शुभ रंग: लाल
कन्या : राशीस्वामी बुध आपल्या राशीच्या कर्मस्थानातून भ्रमण करणार असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात मनासारखे यश लाभेल. नवीन उद्योग सुरू करण्याचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करा. एकाग्रतेने काम केल्यामुळे यश निश्‍चित मिळेल. धावपळ, संघर्ष केल्यानंतर यश मिळेल. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. कामाचे योग्य नियोजन करून तुम्ही सर्व आघाड्यांवर यशस्वी होऊ शकाल. कामाचे ठिकाणी मान-सन्मान लाभेल. व्यवसायात भागीदारावर फार विसंबून राहू नका. नवीन भागीदार घेऊ नका. व्यवसायातल्या जोडिदारावर अतिरिक्त विश्‍वास ठेवू नका. नोकरीत बदली हवी असल्यास प्रयत्न करा. नोकरीत तुमच्या बढतीचा विचार केला जाईल.

पात्रतेप्रमाणे रोजगाराची संधी लाभेल. गुरु आपल्या राशीच्या लाभस्थानातून भ्रमण करणार असल्याने लाभाचे प्रमाण वाढवण्यास मदत करणार आहेत. विद्यार्थ्यांची अभ्यासात जबरदस्त प्रगती होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा आळस करू नये. विद्यार्थ्यांनी आपल्या धेयापासून विचलित होऊ नये. वेळच्या वेळी आणि शिस्तबध्द अभ्यास केल्यास नवीन अभ्यासक्रमात त्याचा चांगला फायदा होईल. प्लुटो आपल्या राशीच्या चतुर्थातून भ्रमण करणार आहे, तेव्हा कौटुंबिक वाद टाळण्याचा प्रयत्न करावा. प्रसंगी थोरामोठय़ांची मदत घ्यावी, वाद वाढवू नयेत. रागावर-चिडचिडीवर संयम ठेवल्यास घरातील वातावरण बिघडणार नाहीत. कौटुंबिक तणाव निवळण्यासाठी स्वत:च्या वागण्या-बोलण्यात तारतम्य ठेवावे. शनि राहू आपल्या राशीच्या धनस्थानातून वाचास्थानातून भ्रमण करणार आहेत. आर्थिक प्राप्ती जेमतेम होईल. आर्थिक व्यवहार करताना कोणतीही जोखीम स्वीकारू नका. कुणालाही पैसा उधार देऊ नका अन्यथा परत घेण्यास अडचणींना सामोरे जावे लागेल. आर्थिक व्यवहार मध्यस्थांच्या हाती देऊ नयेत. आपल्या बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका. गोड बोलून आपली कामे करून घ्या. विचारल्याशिवाय वरिष्ठ वा कनिष्ठांच्या क्षेत्रात प्रतिक्रिया देऊ नये.

शुभ देवता : विष्णु उपासनेला प्राधान्य द्या, मनातील इच्छा पूर्ण होईल.

शुभ रंग : गर्द हिरवा
तूळ : राशीस्वामी शुक्र आपल्या राशीच्या अष्टम स्थानातून १३ तारखेपर्यंत भ्रमण करणार असल्याने आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागणार आहे. उष्णतेच्या विकारापासून सावध राहा. पायाची, पोटाची दुखणी अधूनमधून जगणे असहाय्य करून टाकतील. शारीरिक तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. ज्यांना रक्तदाब व मधुमेहसारखे आजार आहेत त्यांना जास्त सतर्क राहावे लागेल. प्रवासात आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा प्रवासात खाणेपिणे जपूनच करावे लागेल. वाहन न चालवणे आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने फायदाचे होईल. कायद्याचे पालन करावे. गुरू महाराज आपल्या राशीच्या कर्मस्थानातून भ्रमण करणार असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात मनासारखे यश लाभेल. कामात काटेकोर व सतर्क राहावे लागेल.

इतरांशी सल्ला मसलत केली तरी स्वत:चे निर्णय स्वत:च घ्यावेत. नव्या व्यवसायासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. शक्यतो भागीदारावर प्रमाणाबाहेर विश्‍वास ठेवू नये. भागीदारीचे व्यवहार टाळा. स्वबळावर चिकाटीने कष्टपूर्वक व्यवसाय चालू ठेवावा. पती-पत्नीने आपल्या वागण्यात पारदर्शकता ठेवावी म्हणजे गैरसमज होणार नाहीत. जीवनसाथीशी या-त्या विषयांवर वाद, शाब्दीक चकमक टाळावी. अविवाहित उमेदवारांनी धीर सोडू नये. संततीच्या चुकांमुळे त्यांचा आत्मविश्‍वास ढासळणार नाही याची काळजी घेणे. स्वत:ला मिळालेले यश सकारात्मक व्यक्तींना सांगावे. घरगुती प्रश्न सोडविताना भावुकतेला अधिक महत्त्व देऊ नये. नातेवाईकांच्या नकारात्मक वृत्तीकडे दुर्लक्ष करावे. क्षेत्र कोणतेही असो तुम्ही तुमचे ध्येय गाठण्याचा प्रय▪करा. घरात ज्येष्ठांना चुकीची आश्‍वासने देऊ नयेत. आपले मार्गदर्शन इतराना उपयोगी तसेच सिद्ध होऊ शकेल. दगदग व धावपळ करूनच यश लाभेल. एखाद्या चांगल्या घटनेने मनोबल वाटेल. कोणताही निर्णय घेताना सल्ला घ्यावा. दक्ष राहणे व स्वयंसिद्ध होणे गरजेचे आहे.

शुभ देवता : देवीच्या उपासेना प्राधान्य द्या, मनातील इच्छा पूर्ण होईल.

शुभ रंग : पांढरा
वृश्चिक : गुरू महाराज आपल्या राशीच्या नवमस्थानातून भ्रमण करणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रासाठी अनुवूल असा कालावधी लाभेल. गुरुजनांचे आशीर्वाद प्राप्त होतील. राशीस्वामी मंगळ आपल्या राशीच्या लाभस्थानातून १४ तारखेपर्यंत भ्रमण करणार असल्याने आपल्या जिवलग मित्र परिवारांसाठी वेळ काढाल. त्यानंतर राशीस्वामी मंगळाचे व्ययस्थानातील भ्रमण आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. विनाकारण चिडचिड करून स्वत:चे आरोग्य बिघडवू नये. अनारोग्य ओढावल्यास योग्य वेळीच चेकअप व औषधोपचार करावेत.

गरोदर स्त्रियांनी प्रकृतीकडे लक्ष द्यावे. प्रवासात सावधानता बाळगा व प्रकृतीकडे अधिक लक्ष द्या. जुनी दुखणी वर डोके काढण्याची शक्यता असते तेव्हा जपा. प्रणय स्थानात हर्षल आहे. चोरट्या प्रेमाची चटक चांगली नाही हे प्रकर्षाने लक्षात ठेवा. प्रेमात नको ते धाडस करू नका. तरुणांनी प्रेमप्रकरणे सावधपणे टाळावीत. प्रेमात गुरफटलेल्यांनी बेसावध राहू नये. प्रेमसंबंधात जोडीदाराला समजून घेणे गरजेचे आहे. वेळच्यावेळी आणि शिस्तबध्द अभ्यास केल्यास अभ्यासात त्याचा चांगला फायदा होईल. विद्यार्थी वर्गाला अतिशय चांगला असा प्रतिसाद लाभेल. सकारात्मकता ठेवल्यास उत्तम होईल. अभ्यासासंबंधी काही अडचणी असल्यास त्या वडीलधारी मंडळींच्या सहकार्याने दूर कराव्यात. मन शांत ठेवण्याचा प्रय▪करावा. कोणतेही ठोकताळे न आखता केवळ अभ्यास एके अभ्यासच करावा. कौटुंबिक पातळीवर सुसंवादावर भर ठेवावा लागेल. आपले म्हणणे खरे करण्याचा हेका नको. विरोधकांना सामान्य समजू नका म्हणजे प्रश्न कठीण वाटणार नाही. जिद्द व चौकस बुद्धी यामुळे कल्लीण प्रसंगावर मात करता येईल. दुसर्‍याच्या बोलण्याने किती विचलीत व्हायचे याचे भान ठेवा. काही वेळा मन:स्थिती दोलायमान असल्याने निर्णय देणे कठीण होईल. राजकारणात नवीन डावपेच आखावे लागतील. कोणतेही धोके व साहस टाळा. कायदा व नियम यांचे पालन करावे. वेळेचा व मिळणार्‍या संधीचा योग्य उपयोग करूबन घ्यावा लागणार आहे.

शुभ देवता : गणपती उपासेना प्राधान्य द्या, मनातील इच्छा पूर्ण होईल.

शुभ रंग : गुलाबी
धनू : राशीस्वामी गुरू आपल्या राशीच्या अष्टमस्थानातून भ्रमण करणार आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण ल्लेवा. उन्हात हिंडू नका. तब्येतीबाबत गाफील राहू नका. थोडे सबुरीने घ्या. आक्रमतेवर संयम ठेवावा लागेल. मानसिक संतुलन टिकवून ठेवावे लागेल. आजारी व्यक्तींनी एकाच डाँक्टरवर अवलंबून चालणार नाही. गरोदर स्त्रियांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. विद्यार्थी वर्गाला कसोटीचा काल आहे. कोणतेही अंदाज न बांधता केवळ अभ्यास एके अभ्यासच करावा. शिक्षणातील चंचलता कमी करावी. नवीन अभ्यासक्रमात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडेल याची अपेक्षा ठेवू नये. कोणतेही अंदाज न बांधता अभ्यास एके अभ्यास करावा. वाचन वाढवावे. वाचनात विविधता ठेवावी. अभ्यासासाठी दिवसभराचे नियम ठेवावे लागतील. लेखन व विषयातील सखोलता जाणण्याचा प्रय▪करावा. जुनी येणी वसूल करण्यास सुरवात करा. पैशाच्या बाबतीत कोणावरही भरवसा ठेवू नका. आर्थिक गुंतवणुकीसाठी जाणकार तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. कौटुंबिक वातावरण क्षुल्लक कारणांनी बिघडणार नाही यांची दक्षता घ्या. कौटुंबिक कटकटी वाढू देऊ नका. मुलांच्या विकासाकडे लक्ष ठेवा. मुलांना स्वत:वर पूर्ण विश्‍वास ठेवायला शिकवा. मुलांची जिज्ञासू व शोधकवृत्ती वाढवा. मुलांना आयुष्यात ध्येय तसेच उद्देश ठरवायला शिकवा. योजलेली कामे करताना तुम्हाला जिद्द ठेवावी लागेल. कुठल्याही गोष्टींची पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नये. एक गोष्ट मिळवण्यासाठी अन्यत्र तडजोड करावी लागेल. एखादा संकल्प सोडला की त्याच अवलंबन होत आहे की नाही हे बघणेही तितकेच महत्त्वाच आहे. मनात असलेली निराशेची जळमटे दूर करा. वेळेचे भान नेहमीच असू द्या.

शुभ देवता : श्रीदत्त उपासेना प्राधान्य द्या, मनातील इच्छा पूर्ण होईल.

शुभ रंग : पिवळा
मकर : गुरू महाराज आपल्या राशीच्या विवाह स्थानातून भ्रमण करणार आहेत. विवाह इच्छुकांची विवाह विषयक कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात रस उत्पन्न करा. एकमेकांच्या इच्छा व मनोकामना पूर्ण करण्याकडे कल ठेवा. अहंकारास फार महत्त्व देऊ नका. जीवनसाथीच्या हृदयात स्थान मिळवा. शुक्र आपल्या राशीच्या पंचम स्थानातून १३ तारखेपर्यंत भ्रमण करणार आहे. प्रेमात जोडीदाराच्या कलेने घ्या. प्रेमात जोडीदाराशी अधिक जवळीक निर्माण होईल. प्रेमसंबंधात एक दुसर्‍याचे सहकार्य महत्त्वाचे होईल. मनातील नाराजी साथीदारासमोर मांडू नका. हर्षल आपल्या राशीच्या पराक्रम स्थानातून भ्रमण करणार आहे. लेखी व्यवहारात काही प्रमाणात दिशाभूल होण्याची शक्यता आहे. नको त्या ठिकाणी साहस करू नका. कोणाला जामिन राहणे आपल्यासाठी त्रासदायक होऊ शकते. शेजार्‍यांशी सामंजस्य राखणे उचित राहील. राशीस्वामी शनि आपल्या राशीच्या कर्मस्थानातून भ्रमण करणार आहेत. कामाच्या ठिकाणी जबाबदार्‍या वाढतील. पात्रतेप्रमाणे रोजगार मिळेल. जोखमीच्या ठिकाणी काळजीपूर्वक काम करावयास हवे. स्वत:जवळील कौशल्य वापरा. परिणामाशिवाय पर्याय नाही. आपल्या प्रयत्नांचा वेग वाढवा. मनातील संकल्प चिकाटीने पूर्ण केल्यास लाभ होतील. एकदा ठरवलं की त्या दिशेने कामाला लागा, तरच यश मिळेल. कोणत्याही कारणास्तव मनाची चंचलता वाढणार नाही याची काळजी घ्या. वेळेच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्या. कोर्ट खटल्यापासून दूर रहा. आपला क्रांतिकारक विचारांना कृतीत आणा. आपले स्वतंत्र विचार अमलात आणा. अडचणीतून यशाचा मार्ग प्राप्त होईल. आपल्या जबाबदार्‍या सांभाळून धाडस करा. ताण तणावापासून दूर रहाण्याचा प्रय▪करा. कोणतेही वाद वडीलधार्‍यांच्या मार्गदर्शनाने सोडवा. आपल्या विकासाची दीर्घकालीन योजना तुम्ही आखली पाहिजेत. यश मिळवण्यासाठी कोणतीही पळवाट घेणे टाळा. घेण्यापेक्षा देण्यात आनंद माना.

शुभ देवता : शनि उपासेना प्राधान्य द्या, मनातील इच्छा पूर्ण होईल.

शुभ रंग: जांभळा
कुंभ : आपल्या राशीत भ्रमण करणारा नेपच्युन आपल्याला काही सुचक स्वप्ने देण्याची शक्यता आहे. भविष् यकाळातील काही घटना आपल्याला अगोदरच जाणवतील. राशीस्वामी शनि आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार असल्याने भाग्याला चार चाँद लागणार आहेत. बर्‍याच दिवसांपासून दूरच्या प्रवासाला जाण्याची संधी आपल्याला या महिन्यात लाभणार आहे. धार्मिक कामात सहभागी व्हाल. अपरिचीत लोकांची ओळख होईल. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना अतिशय काळजी घ्या, लगेच त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नका. गुरू महाराज आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून भ्रमण करणार असल्याने अभ्यासात सतत काही ना काही अडचणी उभ्या राहिल्याने चित्त विचलित होण्याची शक्यता आहे. विार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करता कामा नये अन्यथा अपयश पदरी पडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासातील एकाता वाढवावी लागेल. आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर टाकू नका. गैरमार्गाने जाणार्‍या मुलांना वेळीच रोखण्याची जबाबदारी पालकांची आहे हे ध्यानात ठेवा. संततीच्या चुका त्यांच्या नजरेला आणून देणे आवश्यक ठरेल. परिस्थितीपुढे माघार न घेता दृष्टिकोन सकारात्मक ठेवल्यास मार्ग निघू शकेल. मानापमानाची भावना बाजूला ठेवून काम केल्यास यश मिळेल. स्वत:च्या अडीअडचणीचा इतरांकडून फायदा उल्लवला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

आवश्यकतेपेक्षा जास्त बोलू नका. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणे सोयस्कर ठरेल. कोणत्याही गोष्टींचा मनावर परिणाम होऊ न देता पुढे मार्गक्रमण करावयास हवे. घरात व बाहेर दोन्ही आघाड्यांवर धैर्याने तोंड द्यावे लागेल. आत्मविश्‍वास वाढवा व स्वत:च्या कर्तृत्वाला अधिक बळकटी आणा. आपल्या मनावर जेष्ठ व्यक्तींचा प्रभाव ठेवा. अचानकपणे मनात असलेला कार्यात बदल करू नका.

शुभ देवता : शनिच्या उपासेना प्राधान्य द्या, मनातील इच्छा पूर्ण होईल.

शुभ रंग : काळा
मीन : हर्षल आपल्या राशीमध्ये महिनाभर असल्याने आपल्याला आपल्या स्वभावात येणारी विक्षिप्तता कमी करणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत शांत राहणे आपल्यासाठी फायद्याचे होणार आहे. राशीस्वामी गुरू आपल्या राशीच्या पंचमस्थानातून भ्रमण करणार असल्याने प्रेमसंबंधात वाढ करण्याचा प्रय▪करा. प्रिय व्यक्तीच्या अडचणीवर मार्ग काढा. भेटवस्तू देऊन आपल्या प्रिय व्यक्तीस खूष ठेवा. आपल्या प्रिय व्यक्तींच्या मतांचा आदर करा. प्रिय व्यक्तीशी गोडी-गुलाबीचे धोरण ठेवा. विद्यार्थ्यांनी दिशाहीन न होता जिद्द ठेवावी.

आपल्या शैक्षणिक क्षेत्रात सरावाचे धोरण अवलंबवावे लागेल. बुद्धिमत्तेस खतपाणी मिळेल, असे खेळ जोपासा. आपले प्रय▪चुकीच्या दिशेने चालू रहाणार नाहीत याची दक्षता घ्या. आपल्या बुद्धिचार्तुयाने सामंजस्याचा गुंता सोडवा. कर्मस्थानातील प्लुटो आपणास काही प्रमाणात सावधानतेचा इशारा देण्यास कारणीभूत होणार आहे. नोकरदारांनी नोकरीत कोणाबरोबर वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कामातील अडचणी दूर करण्याचा प्रय▪करा. नोकरीधंद्यातील स्पर्धा आपणास आव्हान देईल. व्यवसायात भागीदारावर अवलंबून राहू नका. व्यवसायातील निर्णय शांत चित्ताने घ्या. शांत चित्ताने घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल. घरात पाळीव प्राणी पाळत असाल तर त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आवश्यकतेपेक्षा जास्त बोलण्याने सर्वसामान्य गैरसमज पसरू शकतील. सात्विक विचारसरण्ींचा कोणी गैरफायदा घेणार नाही याची दक्षता घ्या. दुसर्‍यांच्या चुका दाखवताना सौम्य शब्दात सांगा. इतरांकडून कोणत्याही सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. आपल्या लहरी आणि हट्टी स्वभावाला थोडी मुरड घातल्यास वातावरण सलोख्याचे राहील. आपला स्वभाव संतुलित ठेवण्याचा प्रय▪करावयास हवा. नाविन्याकडे तुमची झेप ठेवावी लागेल.

शुभ देवता : श्रीदत्त उपासेना प्राधान्य द्या, मनातील इच्छा पूर्ण होईल.

शुभ रंग: गडद पिवळा
सर्व पहा

नवीन

Paush Putrada Ekadashi 2025: पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

Santoshi Mata Vrat Vidhi in Marathi संतोषीमाता व्रत संपूर्ण माहिती

आरती शुक्रवारची

गंभीर आजारांपासून मुक्त राहण्यासाठी अश्वत्थ स्तोत्राचे पठण करा Ashwattha Stotram

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

Show comments