Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मार्च 2014 महिन्यातील भविष्यफल

वेबदुनिया

मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)

WD

कुटुंबीयांच्या साहाय्याने जीवनात आनंद निर्माण होईल. पैशाचा अपव्यय टाळा. बाहेर फिरायला जाण्याचा कार्यक्रम बनू शकतो. शिक्षणाच्या क्षेत्रात विध्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढू शकते. प्रेम संबंध मजबूत होतील. व्यापारात लाभ आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील.


वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

WD

आपले नवे घर बनू शकते. व्यापारात गती सामान्य राहील. राजनैतिक क्षेत्रात आपले वर्चस्व वाढू शकेल. विरोधक आपल्यासमोर मात खातील. हो, फालतू कायदेशीर प्रकरणात फसण्यापासून वाचा. थोड्या विशेष व्यापारी वर्गाला लाभ होऊ शकेल.

मिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा)

WD
सेवेसाठी काही वेळ द्या, लाभ होईल. छोट्या-मोठ्या आजारांकडे दुर्लक्ष केलेत तर आरोग्य चांगले राहील. आर्थिक बाजूही सामान्य राहील. प्रेम-प्रसंगात निरर्थक वाद टाळा.


कर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो)

WD

चांगला काळ येणार आहे. शुभ संदेश आयुष्यात आनंदाची पखरण करतील. या शुभ काळाचा पूर्ण फायदा घ्या. मिळकतीची नवी साधने उपलब्ध होतील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. मन प्रसन्न राहील. व्यापारी लोकांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील.

सिंह (मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे)

WD

मेहनतीचे फळ दिसू लागले आहे, पण अति महत्त्वाकांक्षी बनू नका. रणनीती अवलंबूनच पुढे व्हा. स्वास्थ्य ठीकठाक राहील. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. लक्षात असू द्या, प्रेम देण्याचे नाव आहे म्हणून प्रेमसंबंधात देणे शिका.


कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो)

WD

नशीबाचे ग्रह पालटत आहेत, पण दृढ इच्छाशक्तीशिवाय तुम्हाला यश मिळणारच नाही. तुमच्या मेहनतीचे कौतुक तर होईल पण यासह शत्रूंचे तुमच्याप्रती वैमनस्य वाढेल. वेळॆचे नीट नियोजन केल्यास अडलेली अनेक कामे होऊ शकतील. यावर ध्यान देण्याची गरज आहे.

तूळ (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते)

WD

धंद्याला काळ अनुकूल आहे. नवे व्यवहार लाभदायक असतील. ट्रांसपोर्टशी संबंधित व्यावसायिकांसाठी विशेषकरुन चांगली वेळ आहे. तुमच्याजवळ धन येईल, पण राहणार नाही. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर रहा.


वृश्चिक (ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)

WD

तुमच्या कामाचे कौतुक तर केले जाईल, पण त्यासाठी तुम्हाला धीर धरावा लागेल. तब्येत सामान्य राहील. बॉससोबतचे संबंध सुधारतील. शत्रू शांत राहतील. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे.

धनु (ये, यो, भ, भी, भू, धा, फा, ढा, भे)

WD

महिन्याचा पहिला पंधरवडा थोडा निराशाजनक असेल. होणारी कामे फार प्रयत्न करुनही न झाल्याने निराशा येईल. कोर्टाच्या प्रकरणात फसण्याची शक्यता आहे, यासाठी तुमच्या रागाला नियंत्रणात ठेवा. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर राहणेच योग्य होईल. १५ तारखेनंतर परिस्थिती सुधारेल. मिळकतीचे नवे स्त्रोत उपलब्ध होतील.


मकर (भो, जा, जी, खी, खू, खे, गो, गा, गी)

WD

साधारण महिना. सत्पुरुषांच्या साथीने लाभ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थी वर्गाला फायदा होईल. शत्रू तुमच्यावर हावी होण्याच्या प्रयत्नात आहेत, सावधान राहा. फालतू गोष्टींमध्ये वेळ दवडू नका.

कुंभ (गू, गे, गो, सा, सि, सु, से, सो, द)

WD

बॉससोबत वाद होऊ शकतो, तुमचा अहंकार परिस्थिती बिघडवू शकतो. इतर लोक तुमचा राग तुमच्या विरुद्धच हत्यारासारख्या वापरण्याची शक्यता आहे. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही केलेली घाई-गडबड, नुकसान करू शकते. नोकरीत त्रास होईल. आर्थिक स्तरावर त्रासात राहू शकता, जोडीदाराचे वागणेही तुम्हाला त्रासात टाकू शकते.

मीन (दी, दू, थ, झ, य, दे, दो, ची)

WD

१५ तारख्रेच्या आधी नवे काम सुरु करु शकता. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडयात परिस्थिती बदलू शकते. दूरुन एखाद्या शुभ समाचार कळू शकतो. अडकलेले धन पुन्हा मिळेल. कायदेशीर बाबी त्रास देऊ शकतात. नकारात्मक लोकांपासून दूरच राहा. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नवीन

Makar Sankranti Katha in Marathi मकर संक्रांतीच्या पौराणिक कथा

Shani Pradosh Vrat 2025 शनि प्रदोषाच्या दिवशी हे उपाय करा, आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, महत्व

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

Show comments