Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सहामाही परीक्षा

स्व. सौ. मीना आठल्ये

Webdunia
NDND
थंडीचा मोसम नोटीस आली
सहामाहीची परीक्षा आली
डायव्हर्स देण्याची वेळच आली
लाडक्या ह्या निद्रेला।।1। ।

कोणी परीक्षक स्वप्नात येऊन
भितीची छाया मनात पसरून
सर्व विषयात नापास करून
दुष्ट परीक्षक निघून गेला।।2। ।

पश्चातापें मम मन भरले
बाह्ममन मग हळूच म्हणाले
दसरा दिवाळी गणपती आले
वेळच नव्हता अभ्यासाला।।3। ।

NDND
झडप घातली अंतर्मनाने
हवे कशाला उगीच बहाणे
अभ्यासाची खरी ओढ नसणे
हाच पुरावा सत्याला।।4। ।

क्षणभर आला विचार अचानक
डायव्हर्स द्यावा परीक्षेला तडक
परंतु घरचा कायदाही कडक
भाग परीक्षा देणे मला।।5। ।

आठ दिवसांत कसं तरी जागून
अभ्यास एकदाचा टाकला करून
बसले परीक्षेच्या हॉलमध्ये जाऊन
लागते हातपाय कापायला।।6। ।

NDND
आठ वाजले पेपर आले हातात
धडधड झाली अंत:करणात
नजर फिरविली दोन क्षणांत
' राशी' चांगली होती मला।।7। ।

तयार माझे पांचच प्रश्न धड
सोडवले तीन प्रश्नच फक्कड
चार दिवस गेले घेण्यातच गड
पाचव्या दिवशी पिक्चरला।।8।।

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

दही पालक सूप रेसिपी

पितळेच्या भांड्यात चहा बनवण्याचे फायदे जाणून घ्या

बीए ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्स मध्ये करिअर करा

कापलेली फळे काळी पडणार नाही, या ट्रिक्स अवलंबवा

आले आणि दालचिनी टाकलेले पाणी तुम्हाला हिवाळ्यात 6 अनोखे फायदे देतील जाणून घ्या

Show comments