Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनाम वीरा

Webdunia
शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (16:21 IST)
अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !
 
धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !
 
मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !
 
जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !
 
जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझे बलिदान !
 
काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !
 
कवी- कुसुमाग्रज

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

तुमच्या नखांची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

काकडी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, जाणून घ्या त्याचे 5 चांगले फायदे

या 5 लोकांनी चुकूनही ग्रीन टी पिऊ नये, अन्यथा रुग्णालय गाठवं लागेल

Rice Kheer recipe : पितृपक्षात स्वादिष्ट तांदळाची खीर बनवा

Noodles Side Effects: नूडल्स खाल्ल्याने होतात हे 5 नुकसान, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments