Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आजीचे घड्याळ

Webdunia
मंगळवार, 30 जुलै 2024 (12:46 IST)
आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुना ठाऊक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते
 
“अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,”
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावर
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
“बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की!”
 
ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनिया सकाळ न मुळी पत्त कधी न लागता!
“आली ओटीवरी उन्हे बघ!” म्हणे आजी, “दहा वाजले !
जा जा लौकर !” कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.
 
खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे! आजी परी आंतुनि
बोले, “खेळ पुरे घरांत परता! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन!”
 
आजीला बिलगून ऐकत बस जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात किती हो ध्यानी न ये ऐकता!
“अर्धी रात्र कि रे” म्हणे उलटली, “गोष्टी पुरे! जा पडा!’
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा
 
सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला त्यातूनि
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधूनि तिचे आलो ! तरी ना मिळे!
 
कवी – केशवकुमार

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी

ब्लॅक कॉफी चे आरोग्यासाठी फायदेशीर आणि तोटे जाणून घ्या

हिवाळ्यात कोरड्या त्वचेची, घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने काळजी घ्या

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

योगाच्या या 5 टिप्सचा अवलंब केल्यास नेहमी निरोगी राहाल

पुढील लेख
Show comments