Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केवढे हे क्रौर्य !

Webdunia
क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रूधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पिकणी.
 
महणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरिवते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे पभु पिता अनाथां सदा!
 
अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्र मज मारतील नच ही मनी कलपना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरून घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझया उरीं 
 
निघुन नरजातिला रमिवण्यांत गेले वय,
महणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!
 
म्हणाल, भुलली जगा, विसरली‍ प्रियां लेकरां
महणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.
 
असो, रूधिर वाहुनी नच भिजो सुशयया तरी
म्हणून तरूच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किती सुरम्य ते उत्पल,
नरे धरून नाशिले, खचित थोर बुद्धिबल.
 
मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!


- ना.वा. टिळक

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments