सायंकाळ झाली पक्षी जाती घरा माजी गाय वासरे हंबरती सांगती झाली वेळ आईची आले हसु मजला, हे पण माझे सखी सोबती मी पण पाहते वाट आईची लागली ओढ तिच्या भेटीची
PR
इतुक्यात एक चिमणी छोटीशी येऊनी बसली माझ्या पाशी होती ओठात एक काडी चार्याची आपल्या चिमुकल्यां साठी सांगत होती जणु घालीन घास माझ्या पोरांच्या ओठी ही मिलनाची आस बघुनी मी व्याकुळ झाले मनी केव्हा येईल आई माझ ी
नको वाटते तिची नौकरी दिवस भराची दुसर्याची चाकरी नको राहणे झूलाघरात वाटते राहावे आई पाशी डब्यातले थंड अन्न न मला रूचते शेव, मिक्चर न मला आवडे एकटेपणात न दिवस सरे सारखी आईची आठवण येते
ND
कसे हे जीवन आमचे न आईची कुशी मिळते न प्रेमानी अन्न भरवते बालपण आमचे हे असेच संपते एकटेपणाची आठवण मनात सलत े
कसे हे जीवन चक्र बदलले आई-वडिल दोघेही घरा बाहेर पडले वाट पाहता-पाह ता थकले डोळे सारखी आईची आठवण येते कधी येईल सांगा माझी आई
PR
पक्ष्यांनो तुम्ही तरी सांगाल का? निरोप माझ्या आईला वाट पाहते लेक आईची सायंकाळ ही आता सरू लागली सायंकाळ ही आता सरू लागली.