एक होता जीवा तो अगदी लहान होता तो शाळेत जाऊ लागला मुलांना तो आवडे तो एके दिवशी घरी येत होता बरोबर दुसरे मुलगे होते एक मुलाचे नाव भिवा होते भिवाने जिवाच्या पायात पाय घातला तोच छोटा जिवा जमिनीवर पडला जिवाचे कपडे धुळीत मळले जिवाच्या अंगला घाण लागली मुले जिवाला हसली, पण शिवा चटकन् धावत आला शिवाने जिवाला उचलले जिवाचे कपडे शिवाने झाडले गुरुजी शाळेच्या दरवाज्यात उभे होते गुरुजींनी काय झाले ते पाहिले होते
WD
Nitin Chande
ते मुलांजवळ आले गुरुजी भिवाला रागावले गुरुजींनी शिवाला शाबासकी दिली आणि म्हणाले, ' शिवा, तुला हे पैसे बक्षीस घे. याचे पेढे घेऊन खा.'