Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टोपीवाला आणि माकडे

Webdunia
एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात.

थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो तर काय. पेटीतील सगळ्या टोप्या गायब. तो इकडे तिकडे बघतो. काहीच दिसत नाहीत. मग वर बघतो, तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या.

तो काळजीत पडतो. काय करावे हे त्याला सुचत नाही. तो त्यांना दगडे मारतो. पण ते झाडावरची फळे फेकून त्याला मारतात.

शेवटी वैतागून तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो. हे पाहून ती माकडेही आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकतात. तो पटापट आपल्या टोप्या गोळा करतो आणि तेथून काढता पाय घेतो.

उपदेश :  शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
सर्व पहा

नक्की वाचा

पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात, कंचनगंगा एक्सप्रेसला धडकली मालगाडी

"EVM मध्ये शिवसेनायुबीटीचे उमेदवार 1 मताने पुढे होते", मुंबई उत्तर-पश्चिम सीट रिजल्टवर झालेल्या गोंधळावर संजय निरुपमांचा पलटवार

'जर 400 पार असता तर हिंदू राष्ट्र बनला असता भारत', BJP नेता राजा सिहांचा मोठा जबाब

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात प्रत्येक आजारावर होईल मोफत उपचार, मिळेल चांगली आरोग्य सेवा

Bangladesh vs Nepal : बांगलादेशने नेपाळला हरवून सुपर-8 मध्ये प्रवेश केला, भारताशी होणार सामना

सर्व पहा

नवीन

Career Tips : 12वी पूर्ण केल्यावर या क्षेत्रात करिअर करा

किशोरवयीन मुलांनी रोज करावी ही 5 योगासने, हार्मोन्स संतुलित राहतील

केसांमध्ये उवा असतील तर काळजी करू नका, उवा काढण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

किशोरवयीन मुलींनी मेकअप आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

एकच प्रकारची चटणी खाऊन कंटाळा आला ना, खा ही चविष्ट चटणी लिहून घ्या रेसिपी

Show comments