Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बालगणेशजींची खीर कथा

ganapati
Webdunia
गुरूवार, 12 सप्टेंबर 2024 (14:07 IST)
एकदा श्रीगणेश एका लहान मुलाचे रूप घेऊन चिमूटभर तांदूळ आणि चमच्यामध्ये दूध घेऊन निघाले. ते प्रत्येकाला म्हणत होते की, मला खीर बनवून द्या. कोणीतरी मला खीर बनवून द्या. तेव्हा वाटेमध्ये एक वयस्कर आजीबाई बसल्या होत्या त्या म्हणाल्या आण मी बनवून देते. आजीबाई एक छोटेसे भांडे चुलीवर चढवायला लागली. गणेश म्हणाले आजी छोटेसे भांडे नको ठेऊ. तुझ्या घरातील सर्वात मोठे भांडे ठेव. आजीबाईने तेच केले. आजीबाई पाहतच राहिली की, चिमूटभर तांदूळ मोठ्या भांड्यात टाकल्यानंतर ते भांडे काठोकाठ भरले. गणेश म्हणाले आजी मी अंघोळ करून येतो. खीर तयार झालेली पाहून आजीबाईचे नातवंड रडायला लागले आम्हाला पण खीर हवी. आजीबाई म्हणाली “गणेशजी, मला तुम्हाला खायला द्यायचे आहे”, तिने चुलीत थोडी खीर ठेवली आणि एक वाटी भरून मुलांना दिली.
 
आजीबाईचा शेजारीण वरतुन हे पाहत होती. आजीबाईने विचार केला की ही आपली चुगली करेल म्हणून आजीने एक वाटी भरून तिला खीर खावयास दिली. आजीच्या सुनेने चोरून एक वाटी खीर खाल्ली. तसेच वाटी जात्याच्या खाली लपवली. अजून पर्यंत गणेश आले न्हवते. आजीबाईला देखील आता भूक लागत होती. तिनेही खीरची वाटी भरली आणि दाराच्या मागे बसली आणि पुन्हा म्हणाली की गणेश जी तुमच्या भोगासाठी तयार आहे आणि ते खाऊ लागली, तेवढ्यात गणेशजी आले.
 
आजीबाई म्हणाली “गणेश ये खीर खायला मी तुझीच वाट पाहत होते” गणेश म्हणाले की, “आजी मी तर खीर पहिलेच खाल्ली” आजीबाई म्हणाली केव्हा खाल्ली “केव्हा खाल्ली” गणेशजी म्हणाले “तेव्हा जेव्हा तुझ्या नातवंडांनी खाल्ली, तुझ्या शेजारीण ने खाल्ली तेव्हा,तुझ्या सुनेने खाल्ली तेव्हा. आता तू खाल्लीस तर माझे पोट आता तुडुंब भरले.
 
“आजीबाई गणेश यांना म्हणाली तुझे सर्व म्हणणे बरोबर आहे. पण माझी सून तर सकाळपासून काम करीत आहे तिने कधी खीर खाल्ली. गणेशजी म्हणाले काकू जवळ बघ उष्टी वाटी पडलेली आहे. तसेच तू मला नैवेद्य वाढलास तसेच तिने खाल्ले. आता आजीबाई म्हणाली की, मला सांग आता या राहिलेल्या खिरीचे करू काय? तेव्हा श्री गणेश म्हणाले की, पूर्ण नगरीमध्ये वाटून ये. आजीबाईने पूर्ण नगरीमध्ये खीर वाटली पण खीर काही संपायचे नाव घेते नव्हती. राजाला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने त्या वृद्ध महिलेला बोलावून सांगितले की, “आजीबाई आमच्या घरी असे भांडे पाहिजे?” आजीबाई म्हणाली, “राजा, तू घे.” राजाने वाड्यात खीर मागवली, ती आणताच ती खीर किडे, विंचू, झुरळांनी भरून उग्र वास देऊ लागली.
 
हे पाहून राजा म्हातारीला म्हणाला की, “आजीबाई हे भांडे परत घेऊन जा,जे तू आम्हाला दिले आहेस” आजीबाई म्हणाली, “महाराज तुम्ही देण्यापूर्वी हे भांडे मला गणेश ने दिले आहे” आजीबाईने भांडे परत घेतले. व ते भांडे सुगंधित झाले. घरी आल्यावर आजीबाई गणेशजी यांना म्हणाली की, “राहिलेल्या खिरीचे काय करावे?“तेव्हा गणेश म्हणाले की झोपडीच्या कोपऱ्यात खड्डा खणून गाडून दे. दुसऱ्यादिवशी त्याच ठिकाणी परत खोदशील तर धन मिळेल. असे सांगून गणेश जी अदृश्य झाले. पण जातांना झोपडीला लाथ मारत गेले. तर झोपडीच्या जागी महाल तयार झाला. सकाळी सुनेने पूर्ण घर खोदून काढले. पण काहीही मिळाले नाही. सून म्हणाली सासूबाई गणेश जी खोटे बोलले.
 
तेव्हा आजीबाई म्हणाली सुनबाई माझा गणेश खोटा नाही दे मी पाहते. तिने सुई सुई ने पहिले तर दोन वेळेस धन निघाले. सून म्हणाली सासूबाई गणेश खरं बोलत होते. तेव्हा आजीबाई म्हणाली की, गणेश तर भावनेचा, श्रद्धेचा भुकेला आहे.  
 
तात्पर्य-देव फक्त भावाचा, श्रद्धेचा भुकेला असतो. प्रामाणिक पणाने देवाची आराधन केल्यास देव नेहमी साथ देतो. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

या लोकांनी जेवल्यानंतर फिरायला जाऊ नये, त्यांची तब्येत बिघडू शकते !

World Malaria Day 2025: मलेरिया आणि डेंग्यूमध्ये काय फरक आहे, ते टाळण्यासाठी ही काळजी घ्या

Healthy and Tasty ज्वारीचे कटलेट रेसिपी

लवकर रजोनिवृत्ती टाळण्यासाठी, आजच जीवनशैलीत हे बदल करा

Career in B.Sc Medical Imaging Technology : बीएससी इन मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी मध्ये कॅरिअर

पुढील लेख
Show comments