Dharma Sangrah

जे भाग्यात असते तेच लाभते

Webdunia
एका गावात सोमिलक नावाचा कष्टाळू कोष्टी होता. तो तलम कापड विणण्यात पटाईत होता. पण कष्ट भरपूर करूनसुद्धा अपेक्षित मोबदला त्याच्या हाती येत नव्हता. त्याच्या बरोबरचे इतर कोष्टी जाडंभरडं कापड विणूनसुद्धा भरपूर पैसा कमवित होते. तेव्हा सोमिलकाने दुसर्‍या गावी जाऊन धंदा करण्याचे ठरविले. पण सोमिलकाची बायको त्याला म्हणाली, ''कशाला उगाच दुसर्‍या गावात जाता.... आपल्या नशिबात भरपूर पैसा मिळणार असेल तर याच ठिकाणी कापड विणून मिळेल. पण नशिबात जर नसेल तर दुसर्‍या गावी जाऊनही उपयोग काय?'' तरी हट्टाने सोमिलक दुसर्‍या गावी जातो. भरपूर कष्ट करतो आणि तिनशे मोहरा कमावतो.

त्या मोहरा घेऊन आपल्या गावी येण्यास निघतो. दमल्यामुळे एका झाडाखाली विश्रांती घेता घेता त्याला झोप लागते. थोड्यावेळाने दोन माणसांच्या संभाषणाच्या आवाजामुळे झोप उडते. त्या दोघांचे संभाषण सोमिलक ऐकतो.

'' अरे, कर्त्या... सोमिलकाने आता तीनशे मोहरा कमावल्या पण त्याच्या नशिबात फक्त अन्नवस्त्रापुरताच पैसा आहे'' कर्म विचारतो. त्याबरोबर कर्ता उद्गारतो, ''त्याने कष्ट केले त्याचे फळ मी दिले. ते फळ त्याच्याकडे ठेवायचे की नाही हे तुझं काम!''

दे घोघेजण सोमिलकाचे कर्म आणि कर्ता असतात. सोमिलक पूर्ण जागा होऊन आपली मोहरांची पिशवी बघतो तर ती रिकामी असते!

तात्पर्य : जे भाग्यात असते तेच मिळते.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

Healthy Breakfasts for Summer उन्हाळ्यात सकाळी 'हेल्दी' आणि 'थंडगार' नाश्ता रेसिपी

मधुमेही किवी खाऊ शकतात का? खाण्याचे ४ फायदे जाणून घ्या

Career After 12th B.Tech in Mechatronics Engineering: मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग बी.टेक कसे करायचे,पात्रता, पगार जाणून घ्या

दररोज वारानुसार फेस पॅक लावा आणि जादुई चमक मिळवा

संकष्टी चतुर्थीला बाप्पासाठी बनवा अतिशय सात्विक आणि चविष्ट नैवेद्य

पुढील लेख
Show comments