Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकबर-बिरबल कथा : त्यात अशक्य काय आहे?

वेबदुनिया
बादशहा, दरबारी मंडळी आणि बिरबल असे सर्व लोक एकदा यमुनेचया वाळवंटात फिरायला गेले, तेव्हा सहज म्हणून बादशहाने यमुनेच्या स्वच्छ रेतीत हातातील काठीने एक रेषा काढली. नंतर बरोबरच्या मंडळीकडे पाहून तो म्हणाला, ''या रेषेला अगदी थोडाही स्पर्श न करता, आपणापैकी कोणी तिला लहान करून दाखवील का?''

बिरबल वगळता सर्वजण म्हणाले, '' खाविंद, ते कसे शक्य आहे?''

'' त्यात अशक्य काय आहे?'' असे म्हणून बिरबलाने बादशहाने आधी काढलेल्या रेषेजवळच तिला समांतर अशी तिच्यापेक्षा लांब रेषा काढली व मग बादशहाने काढलेल्या रेषेकडे त्याचे लक्ष वळवून बिरबल म्हणाला, ''खाविंद, पाहा बरे, मी काढलेल्या लांब रेषेमुळे तुमची रेषा एकदम लहान वाटू लागली का नाही? शिवाय तुमची अट पाळून.''
बिरबलाच्या या युकतीवर बादशहा एकदम खूष झाला.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments