Festival Posters

वाईट काळाची बचत

Webdunia
बुधवार, 6 जानेवारी 2021 (17:18 IST)
एक शेतकरी होता. पीक कमी आल्यामुळे तो काळजीत होता. घरात देखील फक्त 11 महिने चालेल तेवढेच रेशन होते. बाकी एक महिन्याचे रेशन कुठून येईल ह्या गोष्टीची काळजी त्याला होत होती. 
 
त्या शेतकऱ्याच्या सुनेच्या लक्षात आले की बाबा कोणत्या तरी काळजीत आहे तिने त्या शेतकऱ्याला विचारले की -' बाबा आपण फार काळजीत दिसत आहात काय झाले कशाची काळजी घेत आहात ? तेव्हा त्याने आपल्या सुनेला काळजीचे कारण सांगितले. 
 
शेतकऱ्याची गोष्ट ऐकून सुनेने त्याला सांगितले की बाबा आपण काळजी करू नये एका महिन्याच्या रेशनची देखील व्यवस्था होईल. 
त्यांचे संपूर्ण वर्ष चांगले गेले तेव्हा शेतकऱ्याने आपल्या सुनेला विचारले की असे शक्य कसे झाले?
 
सून फार हुशार होती तिने सांगितले- की जेव्हा आपण मला सांगितले की एक महिन्याच्या रेशनची व्यवस्था कशी होणार त्या दिवसापासूनच मी एक एक मूठ धान्य काढून वेगळे ठेवले त्यामुळे बाराव्या महिन्याची व्यवस्था होऊ शकली. 
 
तात्पर्य- या कहाणी पासून आपल्याला शिकवण मिळते की जीवनात बचत करण्याची सवय लावावी. जेणे करून वाईट काळात कामी येऊ शकेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचे फायदे जाणून घ्या

Parenting Tips: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलाला प्रेरणा कशी द्यावी

नैतिक कथा : चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य

Breast Self-Examination दर महिन्याला करा स्वतःची तपासणी; जाणून घ्या योग्य पद्धत

तुम्हाला डाळिंबाचे दाणे काढण्याचा कंटाळा येतो का? तर या युक्त्या वापरून पहा, काही सेकंदात डाळिंब सोलून त्याचे दाणे काढू शकता

पुढील लेख
Show comments