Festival Posters

जीवनसत्त्व

Webdunia
एका बड्या शेठजींचा मुलगा वाईट संगतीमुळे जुगारी बनला. शेठजी बरेच म्हातारे होते. आपल्यानंतर हा सर्व पैसा जुगारात घालवेल याची चिंता लागली होती. एकदा खूप आजारी असताना मुलाला बोलावून तो म्हणाला, 'मी आज माझी अंतिम इच्छा तुला सांगणार आहे.'
 
'जुगाराचे व्यसन सोडून दे, याखेरीज ती कोणतीही असेल तर मी नक्की पूर्ण करीन,' असे मुलाने आश्वासन दिले.
 
वडील प्रेमळपणे म्हणाले, 'तुझे सुख तेच माझे सुख. जुगार सोडायला सांगून मी तुला दु:खात लोटणार नाही. तुला आनंद होईल अशीच गोष्ट मी सांगणार आहे. मी मेल्यानंतर आपल्या नातलगांकडून पगडी बांधून न घेता शहरातील सर्वात मोठा जुगारी शोध नि त्याच्याकडून पगडी बांधून घे, एवढीच माझी इच्छा आहे!' वडिलांची ती इच्छा ऐकून त्याचा आनंद गगनात मावेना. 
 
यथाकाल वडिलांचे निधन झाल्यावर त्याने गावातील सर्व प्रमुख जुगारींना बोलावून वडिलांची अंतिम इच्छा ऐकवली. मग काय विचारता, एकेक जण आपणच कसे महान जुगारी आहोत ते सांगू लागला. एकजण म्हणाला, 'वडिलांनी 40 लाखांची संपत्ती ठेवली होती. ती मी जुगारात घालवून आज माझ्याजवळ एक पैसापण नाही.' दुसरा म्हणाला, 'मी घरदार, सर्व संपत्ती जुगारात घालवली व आज मला 50 लाखांचे कर्ज आहे.' तिसरा म्हणाला, 'जुगारासाठी मी चोर्‍या केल्या. कारावास भोगला. शेवटी पत्नीलाही पणाला लावले.'
 
मुलगा ते सर्व ऐकल्यानंतर म्हणाला, 'मला पगडी बांधावयाची नाही. वडिलांनी माझी स्थिती कशी होईल ते चित्र मला दाखवले. मी व्यसन सोडले.'
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

Who should avoid Lychee या ५ प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नये 'लिची'; फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान!

घराच्या कोपऱ्यात लपलेली झुरळे आणि मुंग्या होतील गायब; फक्त हा १ सोपा घरगुती उपाय करून पहा!

चविष्ट, पौष्टिक आणि झटपट होणारा दक्षिण भारतीय पदार्थ व्हेज उपमा

व्हाईट ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड का खावा? जाणून घ्या मोठे फायदे

Career in Bachelor of Technology (B.Tech) in Biomedical Engineering :बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन बायोमेडिकल इंजिनीअरिंग करून करिअर बनवा, पात्रता व्याप्ती जाणून घ्या

Show comments