Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बोधकथा : ज्ञानी व अज्ञानी

Webdunia
शनिवार, 26 एप्रिल 2014 (14:58 IST)
आगगाडीचा प्रवास करीत असताना, एका प्राध्यापकाला आपल्या शेजारी एक आडाणी शेतकरी बसला असल्याचं आढळून आलं. स्वत:च्या ज्ञानाची घमेंड बाळगणारा तो प्राध्यापक थोडय़ाच वेळात त्या आडाणी शेतकर्‍याची थट्टा करून आजूबाजूच्या बसलेल्या प्रवाशांची करमणूक करू लागला. थोडा वेळ ती थट्टा निमूटपणे सहन केल्यावर तो शेतकरी त्या प्राध्यापकाला म्हणाला, साहेब, काही झालं तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अज्ञानी. तरीसुद्धा आपला गाडीतला वेळ चांगला जावा, म्हणून आपण एकमेकांना कोडी घालूया. मी आडाणी व गरीब असल्याने कोडं सोडवण्यात जर मी हरलो, तर मी तुम्हाला फक्त पाच रुपये द्यायचे आणि जर तुम्ही हरलात, तर तुम्ही मात्र मला पंचवीस रुपये द्यायचे. आहे कबूल?
 
हे ऐकून तो प्राध्यापक आनंदला आणि अवतीभवतीच्या सहप्रवांशावर छाप मारायलाही सुसंधी आपल्याकडे आपणहून चालून आली आहे असा विचार करून त्या शेतकर्‍याला म्हणाला, तुझी कल्पना मला मान्य आहे. पहिलं कोड, तू मला घाल.
 
शेतकर्‍यानं विचारलं, ज्याला उडताना तीन पाय, चालताना दोन पाय आणि बसला असता फक्त एक पाय असतो, असा पक्षी कोणता?

या कोडय़ाचं उत्तर देता न आल्यानं प्राध्यापक काहीसा ओशाळून म्हणाला, बाबा रे, मी हरलो. हे घे पंचवीस रुपये, आणि या कोडय़ाचं उत्तर तू मला सांग. प्राध्यापकानं दिलेल्या पंचवीस रुपयांपैकी वीस रुपये स्वत:च्या खिशात टाकून, उरलेले पाच रुपये त्या प्राध्यापकाच्या हाती देत तो शेतकरी म्हणाला, मला सुद्धा या कोडय़ाचं उत्तर देता येत नाही, म्हणून मी हरल्याचे पाच रुपये तुम्हाला देत आहे.

एक आडाणी शेतकर्‍याने हातोहात चकविल्यामुळे फजिती पावलेला तो प्राध्यापक झटकून तिथून उठला व दुसर्‍या डब्यात गेला.
 
 राहुल पवार

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

तेनालीराम कहाणी : लाल मोर

आरोग्यासाठी फायदेशीर आहे नारळाची मलाई

Show comments