Dharma Sangrah

Cooking Tips: घरी मफिन बनवताना या चुका करू नका

Webdunia
सोमवार, 31 जुलै 2023 (15:13 IST)
Cooking Tips :जेव्हा काहीतरी चांगले आणि गोड खाण्याची इच्छा असते तेव्हा लोकांना मफिन खायला आवडते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मफिन खायला आवडतात. बहुतेक लोक ते घरी बनवण्यास प्राधान्य देतात.पण अनेकदा घरी मफिन्स हवे तसे चविष्ट बनत नाही. मफिन्स बनवताना या चुका करणे टाळा. जेणे करून मफिन्स चविष्ट बनतील.
 
पीठ जास्त मिसळणे-
ही एक सामान्य चूक आहे जी आपण सर्वजण मफिन बनवताना करतो. चांगले आणि चवदार मफिन हलके असतात. तुम्ही पीठ कसे मिसळता याचा तुमच्या मफिन्सच्या टेक्सचरवर मोठा प्रभाव पडतो. जर तुम्ही पीठ जास्त मिक्स केले तर हवेचे बुडबुडे निघून जातात आणि तुम्हाला ते फ्लफी पोत मिळत नाही. त्यामुळे कोरडे आणि ओले घटक एकत्र येईपर्यंत ते मिसळण्याचा प्रयत्न करा.  
 
मफिन लाइनरचा वापर न करणे -
 पण मफिन्स बनवण्यासाठी आधी मफिन लाइनरचा साच्यात वापर करणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे मफिन लाइनर नसल्यास, कप ग्रीस करा किंवा पार्चमेंट पेपरने स्वतःचे लायनर बनवा. या मुळे मफिन्स कपमधून सहजपणे निघते. 
 
मफिन्स व्यवस्थित न शिजवणे -
मफिन बनवताना, ते योग्य प्रकारे शिजवणे खूप महत्वाचे आहे. ओव्हर कुकिंग आणि अंडर कुकिंग दोन्ही मफिन्सची चव खराब करतात. जर तुम्ही ते कमी वेळ शिजवले तर ते मफिन्स चिकट बनतात  आणि मध्यभागी कमी शिजतात. दुसरीकडे, बऱ्याच  काळासाठी शिजवल्यामुळे ते खूप कोरडे आणि निरुपयोगी दिसतात. त्यामुळे ते बेक करण्यासाठी तुम्ही रेसिपी नीट फॉलो केल्यास उत्तम होईल. तसेच, मफिन्सची चाचणी घेण्यासाठी टूथपिक वापरा.
 



Edited by - Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

Lohri 2026 Special Dishes लोहरी विशेष बनवले जाणारे खास पदार्थ

Lohri Wishes in Marathi 2026 लोहरीच्या शुभेच्छा मराठीत

Sankranti Bhogi 2026 अस्सल मराठमोळी भोगीची संपूर्ण थाळी

वजन कमी करण्यासाठी अंजीरचे फायदे, दररोज किती खावे जाणून घ्या

Jobs: प्रसार भारतीमध्ये एमबीएसाठी भरती; या तारखेपर्यंत अर्ज भरा

पुढील लेख
Show comments