Dharma Sangrah

महत्त्वाच्या किचन टिप्स

Webdunia
* मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा.
* तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला. भात पांढरा होतो.
* पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा. यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो.
* सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा. मनासारख्या आकारात कापता येईल.
* रस्सा दाट, स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाचा चव मिक्सरला करून रश्शात घालावा.
* कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते.
* भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं.
* हाताला किंवा पाटा-वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा.
* पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा. पुर्‍या खुसखुशीत बनतील.
* मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा.
* डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा.
* दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला. दूध खाली लागणार नाही.
* हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा. त्यात लोहाचे प्रमाण वाढते.
* भाज्या, कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका. यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामुळे हे फेकू नाही. हे पाणी भाजीत किंवा कणीक मळताना ही वापरता येते. उकळून न घेता हे यांना वाफेवर ही शिजवू शकता.
* भाज्या किंवा फळे 4-5 तास आधीपासून कापून ठेवू नये.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पार्टीपूर्वी झटपट चमक हवी आहे का? होममेड हायड्रा फेशियल करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Green Vs Black Grapes: हिरवे की काळे द्राक्षे खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

International Women's Day 2026 Wishes in Marathi जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

जागतिक महिला दिन 2026 : महिलांच्या सुरक्षिततेबद्दल प्रत्येकाने जाणून घेतल्या पाहिजेत अशा 4 महत्त्वाच्या गोष्टी

जातक कथा : अहंकारी बेडूक

पुढील लेख
Show comments