Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मिक्सर ग्राइंडर वापरताना या टिप्स लक्षात ठेवा, मिक्सर लवकर खराब होणार नाही

मिक्सर ग्राइंडर वापरताना या टिप्स लक्षात ठेवा, मिक्सर लवकर खराब होणार नाही
, बुधवार, 29 डिसेंबर 2021 (15:30 IST)
पालक पनीर बनवण्यासाठी पालक बारीक करण्याचा विषय असो किंवा ग्रेव्हीसाठी टोमॅटो बारीक करणे असो, स्वयंपाकघरात दररोज मिक्सर ग्राइंडरचा वापर केला जातो. मिक्सर ग्राइंडरचा वापर कधी शेक बनवण्यासाठी तर कधी स्मूदी बनवण्यासाठी केला जातो. मात्र,मिक्सरला निष्काळजीपणे वापरल्यामुळे तो पुन्हा पुन्हा खराब होतो. अशा परिस्थितीत या गोष्टी वापरण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आणि काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा.जेणे करून मिक्सर पुन्हा पुन्हा खराब होणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 गरम वस्तू घालणे टाळा - अनेकदा काही गोष्टी गरम करून दळून घ्याव्या लागतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपण ब्लेंडरमध्ये गरम वस्तू टाकता तेव्हा मिक्सरमध्ये हवा बनते, त्यामुळे झाकण अचानक उघडते. हे खूप धोकादायक असू शकते. अशावेळी गरम वस्तू आधी थंड करा नंतर बारीक करून घ्या.
2 जास्त भरणे- काहीवेळा गोष्टी लवकर पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्वकाही एकाच वेळी बारीक करावेसे वाटते. अशा परिस्थितीत, आम्ही आवश्यकतेपेक्षा अधिक सामग्री ब्लेंडरमध्ये भरतो. अशा परिस्थितीत काम अनेक पटींनी वाढते कारण ओव्हर फिलिंगमुळे त्याचे झाकण उघडून साहित्य बाहेर येते  आणि त्यामुळे  काम दुप्पट वाढते. 
 
3 झाकण तपासा - कधीकधी घाईत, आम्ही ब्लेंडरचे झाकण चांगले बंद करत नाही आणि बटण चालू करतो. हे खूप धोकादायक असू शकते, म्हणून सामान टाकल्यानंतर, झाकण चांगल्या प्रकारे बंद केल्याची खात्री करा मगच बटण चालू करा. 
 
4 ब्लेंडर लगेच स्वच्छ करा - काही लोक ब्लेंडर वापरल्यानंतर लगेच धुत नाहीत, असे केल्याने मिक्सर खराब होऊ शकतो. तसेच त्यात बॅक्टेरिया असू शकतात. तसेच, काही वेळा ठेवलेले ब्लेंडर साफ करणे खूप कठीण जाते. त्यामुळे ते त्वरित स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या घरी बनवता येतात, जाणून घ्या