Dharma Sangrah

आलू पराठा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, पण तो हॉटेलसारखा चविष्ट होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे

वेबदुनिया फीचर टीम
सोमवार, 27 एप्रिल 2026 (19:57 IST)
आलू पराठा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, पण तो हॉटेलसारखा खुसखुशीत आणि चविष्ट होण्यासाठी काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.  तर चला आज आपण उत्तम आलू पराठा बनवण्यासाठी या काही खास टिप्स पाहणार आहोत. 
ALSO READ: तुमच्या रोजच्या जेवणाला 'स्पेशल टच' देण्यासाठी या ४ सोप्या टिप्स नक्की वापरून पहा
१. बटाटे हाताने मॅश करण्याऐवजी किसणीने किसून घ्या. यामुळे बटाट्याचे मोठे तुकडे राहत नाहीत आणि पराठा लाटताना फाटत नाही.
 
२. पराठ्यासाठी कणीक मळताना ती जास्त घट्ट नसावी. कणीक नरम आणि लवचिक  असावी. यामुळे सारण पराठ्यात व्यवस्थित पसरते. तसेच कणीक मळल्यावर किमान १५-२० मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून ती छान मुरेल.
 
३. सारण बनवताना त्यात पाणी अजिबात नसावे. बारीक चिरलेला कांदा वापरणार असाल, तर तो बटाट्यात मिसळण्यापूर्वी त्याचे जास्तीचे पाणी पिळून काढा. व आमचूर पावडर किंवा चाट मसाला जरूर वापरा, यामुळे छान चटपटीत चव येते. बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि भरपूर कोथिंबीर चव वाढवतात.
 
४. पराठा टाकण्यापूर्वी तवा व्यवस्थित गरम झालेला असावा. पराठा भाजताना तेल वापरण्यापेक्षा तूप किंवा बटर वापरा. यामुळे पराठा अधिक खुसखुशीत लागतो. जर तुमचे सारण चुकून थोडे मऊ झाले असेल, तर त्यात थोडे भाजलेले बेसन किंवा ब्रेड क्रम्ब्स मिसळा. यामुळे जास्तीचा ओलावा शोषला जाईल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: लंचबॉक्स म्हणजे फक्त जेवण नसतं, तर तुमचं प्रेम असतं! टिफिन मध्ये द्या हे पदार्थ नवरोबा अगदी खुश होईल
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: आईने दिलेले लोणचे कोरडे झाले का?, ते पुन्हा पूर्वीसारखे चटपटीत आणि रसरशीत करण्यासाठी या खास ट्रिक्स

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

अकबर-बिरबलची कहाणी : तरंगता महाल

आलू पराठा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, पण तो हॉटेलसारखा चविष्ट होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे

भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला कुठे आहे? ज्यात अनेक रहस्ये दडलेली आहे

सावधान! कलिंगड खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ; होऊ शकते विषबाधा

स्त्रिया या ५ गोष्टी कधीच सांगत नाहीत… पुरुषांनी नक्की जाणून घ्याव्यात

पुढील लेख
Show comments