Dharma Sangrah

पाक सल्ला

सॉ. वैजयंती श्रीधर बुचे
लिंबाचा रस काढण्यापूर्वी ते काही वेळ गरम पाण्यात बुडवून ठेवा. अधिक चांगल पिळलं जाईल.
केळी पिकून फुकट जाणार असतील, तर ती सालासकट फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे जास्त पिकणार नाहीत.
बटाट्यांमध्ये एखादं सफरचंद ठेवून दिल्यास बटाट्यांना लवकर कोंब येत नाहीत.
पदार्थामध्ये लोणी वापरताना ते लवकर वितळायला हवं असेल तर गरम केलेला बाऊल किंवा भांडं त्यावर उपडं ठेवा.
अंडी वापरायच्या 15-20 मिनिटं आधी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवावे.
मसाला करताना मिरचीचे देठ काढून त्याला तेलाचा हात फिरवून उन्हात एक दिवस वाळवावी. मग दळावी. रंग चांगला‍ येतो.
मशरूम स्वच्छ करताना पाण्याने धुणं टाळा. कारण त्यांची चव कमी होते. त्याऐवजी एखाद्या ब्रशने ते स्वच्छ करून घ्या.
अनेकदा खूप दिवस न वापरल्याने मनुका सुकून जातात. अशा मनुका पदार्थात वापरण्यापूर्वी पाण्यात बुडवा. त्या पुन्हा फुलून येतील.
अंड्याचा बलक फ्रीजमध्ये साठवायचा असल्यास त्यावर एक चमचा पाणी टाकून ठेवा म्हणजे तो ओलसर राहील.
कैरी किसून कडकडीत होईपर्यंत वाळवून पावडर करावी. आमचूर पावडर होते. आयत्या वेळी आमटीत-चटणीत वापरतो येते.
हळद करताना हळकुंड रात्री पाण्यात भिजत घालावीत. सकाळी त्यातले पाणी निथळून टाकावे. मग ती अडकित्याने कापून बारीक तुकडे करून दोन दिवस उन्हात वाळवून मग दळून आणावी. रंग चांगला येतो.
लिंबाचे सरबत केले की त्याच्या फोडी उन्हात वाळवून ठेवाव्यात आणि शिकेकाई कुटताना त्यात कुटाव्यात.
आवळे किसून मीठ लावून उन्हात वाळवून ठेवावेत. प्रवासात आवळा सुपारी मिळेल. किसाला आल्याचा रस चोळला आणि वाळवले तरी सुपारी पित्ताला शामक अशी होते. तोंडाला चव येते. उलटी, मळमळ होणे कमी होते.
सफरचंद कापताना सुरीवर लिंबू चोळा म्हणजे सफरचंद काळवंडणार नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

टरबूज विकत घेताना या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे ते गोड लागेल

लघु कथा : एक होती चिमणी

कुकरमध्ये भात आणि वरण व्यवस्थित शिजण्यासाठी काही छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स

दुपारच्या जेवणासाठी मसालेदार आणि रसरशीत मुगाची उसळ; उत्तम आणि पौष्टिक पर्याय

ओवा खाण्याच्या चुकीच्या पद्धतीने नुकसान होऊ शकते, योग्य पद्धत जाणून घ्या

Show comments