Festival Posters

स्वयंपाकघरातील उपयोगी टिप्स..

Webdunia
बुधवार, 9 सप्टेंबर 2015 (13:20 IST)
आपण कधी-कधी जास्त राहिलेल्या पदार्थांना फेकून देतो किंवा एखादा पदार्थ करत असताना तो बिघडतो. त्या वेळी काय करावे यासाठी काही खास टिप्स पुढीलप्रमाणे:
 
गॅस वापरून झाल्यावर रात्री झोपण्यापूर्वी खालून बंद करावा व गॅस शेगडी स्वच्छ करून मगच झोपावे त्यामुळे झुरळ, पाली किंवा मुंग्या होण्याची शक्यता असते. 
 
बाजारातून आणलेले पदार्थ हवाबंद डब्यामध्ये ठेवावा. व पदार्थ उरला तर परत डब्यामध्ये ठेवावा व लवकर संपवावा कारण तो पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. 
 
ओट्यावर जास्त भांडी किंवा वस्तू ठेवू नका त्यामुळे ओटा हा भरलेला वाटणार नाही व किचनमध्ये काम करण्यासाठी ही तुम्हाला आवडेल. 
 
दुधाच्या पिशव्या फाडून, प्लास्टिकच्या बाटल्या मोडून, तेलाच्या पिशव्या फाडून किंवा औषधाच्या बाटल्यांचे लेबल काढून टाकावे त्यामुळे त्या वस्तूंचा पुनर्वापर केला जात नाही. 
आपण काही भांडीना बॉक्समध्ये टाकून वर ठेवून देतो. मात्र अशा भांडयांना कमीत-कमी एक-दोन महिन्यानंतर काढून बघावे त्यांचा वापर न केल्यास गंज लागण्याची ही शक्यता असते. 
 
किचनमध्ये असणार्‍या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू नियमित वापरात ठेवाव्या अन्यथा त्या बिघडण्याची शक्यता असते. 
 
एखादा पदार्थ जास्त झाल्यास तो चांगला असल्यास दुसर्‍या दिवशी ही खावू शकतात मात्र एकदा का तो पदार्थ फ्रिजरमधून बाहेर काढल्यास लगेच संपवावा पुन्हा फ्रिजमध्ये ठेवू नये. 
 
फ्रिजमधून काढलेले पदार्थ नियमित थोडा वेळ बाहेर ठेवून मग गरम करून खावे. 
 
किचन मोकळे असावे असे वाटत असल्यास जास्तीत-जास्त सामान भिंतीवर असलेल्या कप्प्यात ठेवावा . नको असलेल्या वस्तू काढून टाका.
 
कडधान्य किंवा वाळलेले पदार्थ ही लवकरात लवकर संपवावी कारण जास्त दिवस ठेवली की ती खराब होतात. 
काही जण वर्ष भरासाठी लोणची बनवतात. मात्र ती टिकट नाही अशी खूप वेळा महिलांची तक्रार असते. त्यासाठी लोणची ही चिनीमातीच्या बरणीमध्ये भरून ठेवावी व त्या बरणीला बाहेरून पातळ सफेद रंगाचा कपडा लावावा. दररोजच्या वापरांसाठी लोणच्याची वेगळी बरणी असावी. लोणच्याच्या बरणीमध्ये एक चमचा टाकून ठेवावा. दुसरा चमचा त्यांत बुडवू नये असे केल्यास लोणची टिकून राहील.  
 
काही पदार्थ ही कच्ची खाण्यापेक्षा त्यांना एक उकळी देवून खावे त्यामुळे ते पचनासाठी जास्त वेळ लागत नाही. 
 
दूध जर फ्रिजमध्ये ठेवले असल्यास लगेच तापवू नका त्यामुळे ते फाटण्याची शक्यता असते. 
 
गोड पदार्थामध्ये थोड्याशा प्रमाणात मीठ ही घालावे त्यामुळे पदार्थ जास्त चविष्ट होतो. 
 
कधी कोणत्या पदार्थाला आबंटपणा आण्यासाठी घरात लिंबू नसल्यास व्हिनेगरही टाकू शकतात. त्यामुळे आंबटपणाची चव येते मात्र व्हिनेगार हे संभाळून घालावे त्यामुळे पदार्थ जास्त आंबट होवू शकतो. 
 
कणिक मळतांना त्यामध्ये २ छोटया पळी तेल घाला व पीठ पोळ्य़ा लाटण्यांच्या एक तास अगोदर मळून एका सफेद रंगाच्या पातळ कपडयात बांधून ठेवावे त्यामुळे पोळ्य़ा छान फुगतात.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

लग्नानंतर सासरच्यांसोबत बॉन्डिंग कसं वाढवाल? नव्या सुनेसाठी ५ सोप्या आणि प्रभावी टिप्स

Show comments