Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

स्नेहा कुंटला

वेबदुनिया
WD
जीवन इतके सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकात, मार्ग तुम्हाला सापडत जाईल.

जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन घडीचा डाव, जीवन हा एक संघर्ष आहे, जीवनाच अशा अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केल्या आहेत. आपले जीवन हा एक अनुभवप्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे त्याला स्वत:ला येणार्‍या अनुभवांवर अवलंबून असते. जीवनात चढउतार असणार. जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु:ख असे क्वचितच आढळते. जाईल त्या क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे व प्रगतिपथावर राहावे. ही प्रक्रिया सुरू होण्यात व चालू राहण्यात जीवनाचे सार्थक आहे.

एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं,
हवं असतं तेच मिळत नसतं,
हवं ते मिळालं तरी खूप काही कमी असतं,
चांदण्यांनी भरुनसुध्दा आभाळ आपलं रिकामं असतं.

खरे म्हणजे जगण्याइतके आनंददायक असे जीवनात काहीच असू शकत नाही. सर्व कला, क्रीडा, साहित्य, संगीत, शास्त्री संशोधन हे जीवनाचे विलास आविष्कार आहेत. त्यात जे रस घेतील त्यांना सविकल्प समाधीचे सुख लाभेल. हे सहज सौख्य माणसे विसरतात. खेळीमेळीच्या वातावरणात, विचारांच आकाशात आपापल्या मतांचे पतंग सोडावेत आणि प्रसंगी काटावेत, पण हा ऐश्र्वर्यछंद रंगपंचमीप्रमाणे सुखद सोहळाच ठरावा.

जीवन ही मानवाला लाभलेली अमोल देणगी आहे. तिचा चांगला उपयोग करणे महत्त्वाचे आहे. माणसाने केवळ क्षुल्लक दु:खाने व्यथित होऊन त्याचा शोक करत बसू नये. त्याने एखाद्या आंधळ्याचा डोळा व्हावे, लंगडय़ाचा पाय व्हावे, अनाथाला पालकसुध्दा व्हावे, दुसर्‍याला आनंद द्यावा, दुसर्‍यासाठी जगावे.

जगावे, जगू द्यावे, जगता-जगता जीवनाकडे पाहावे, जमेल तेवढे जाणावे या जाणिवेचे गाणे गुणगुणत पुढे जात राहावे, स्वत:ला विसरून अवैयक्तिक पातळीवरुन जीवन वैभवाचा स्पर्श अनुभवावा.

माणसाने जगण्याचा प्रयत्न करावा आणि प्रयत्नपूर्वक जगावे. हे जग सुंदर व्हावे, यासाठी या जगात जाणीवपूर्वक व जाणतेपणाने राहावे व रमावे. अशा जगण्यात जिवाचा गौरव आहे. माणसांजवळ विचारशक्ती आहे. आचारशक्ती आहे, सदबुद्धी आहे. एखाद्या आजाराप्रमाणे जीवनात प्रवेश करणारा खोटेपणा निपटून काढला व साधे, सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम असे जीवनब्रह्मचे रूप आपण सतत अनुभवत राहू. निरभ्र आणि अथांग आकाश, सूर्य, चंद्र यांचे उदास्त, सतत खळखळणारे लहानांचे हसणे, पायाशी घोटाळणार्‍या कुत्र्याचे इमान, थोडे प्रेमाचे बोलणे केले की वृध्दांच्या नेत्रात तरळणारे अश्रू, एखादा रुपया हातावर ठेवला तर चार पिढय़ांना आशीर्वाद देणारा देवाच्या दारातील विकलांग भिक्षू, पहाटेच्या प्रहरी मंदिरातून येणारा घंटानाद, आभाळातून झेपावत जाणारे पाखरांचे थवे, शाळेच्या प्रांगणात बाळगोपाळांच्या कंठातून बाहेर पडणारे प्रार्थनागीत.. अशा अनेक अंगांनी नटलेले, सजलेले हे जीवन किती विलोभनी आहे.

जीवनातील अशा कितीतरी गोष्टी आपल्याला जगण्यासाठी उत्साह देतात. प्रेरणा देतात म्हणूनच आपणही प्रतिभासंपन्न कवी मंगेश पाडगावकर यांच्या सुरात सूर मिसळून म्हणूया - ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे ’.


सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

बाजरीची इडली रेसिपी

आवळ्याच्या पाण्याची वाफ घ्या,सर्दी आणि घसादुखीपासून त्वरित आराम मिळवा

Career in MBA in Agribusiness : कृषी व्यवसायात एमबीए कोर्स मध्ये करिअर

ऐक्नेसाठी लाल कोरफड वापरा, स्किन उजळेल

थंडीत रात्री मोजे घालून झोपत असाल तर जाणून घ्या हे सत्य

Show comments