Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एन्जॉय इन ऑफिस

वेबदुनिया
तुम्ही दिवसातील जास्तीत जास्त वेळ कोठे घालवता? असा प्रश्न नोकरी करणार्‍या कोणालाही केला तर त्याचं उत्तर ‘ऑफिसमध्ये’ असंच असेल. बहुतेकींचा दिवसातील जास्तीतजास्त वेळ ऑफिसमध्येच जात असतो. कामाचे तास वाढल्यामुळे दिवसातील बराच वेळ ऑफिसमध्येच जातो. त्यामुळे तेथील वातावरण आणि आपला मूड हे दोन्ही चांगलं असेल याची काळजी घेणं गरजेचं असतं. या दोन्ही घटकांकडे लक्ष दिलं तरच आपण ऑफिसमध्ये चांगल्या पद्धतीने काम करु शकू. बहुतेक लोकांना ऑफिसमधील कामाचा बराच ताण असतो. त्याचा परिणाम कामावर होतोच त्याचबरोबर आरोग्याच्यादृष्टीनेही हा ताण घातक आहे. आपल्याला कामामध्ये काही अडचणींना सामोरं जावं लागतं. तरीही डोकं शांत ठेवून आशावादी राहावं. याचं कारण आपल्या इच्छेनुरुपच सारं होईल असं नाही. त्यामुळे मनात धैर्य असावं. डोक्यात नकारात्मक गोष्टी आणू नका.

ज्या लोकांबरोबर आपल्याला दिवसातले आठ ते बारा तास घालवायचे आहेत त्यांच्याबरोबर आपला व्यवहार मैत्रीपूर्ण असायला हवा हे स्पष्ट आहे. ऑफिसमध्ये आपण कामाचं प्रेशर झेलत असतोच पण, सहकार्‍यांबरोबर मतभेद, वाद झाले तर त्याचा परिणामही आपल्या कामावर होत असतो. एकमेकांच्या सहकार्याशिवाय कोणतंही काम होऊ शकत नाही हेदेखील आणखी एक सत्य आहे. कधी ना कधी आपल्याला कामासाठी दुसर्‍या कोणाची मदत घ्यावी लागतेच. त्यामुळे ऑफिसमधील लोकांशी बोलताना आपला चेहरा हसतमुख आणि त्यांच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करावा.

अनेकदा आपण मनातील राग शब्दांनी व्यक्त करत नाही. पण, बॉडी लँग्वेजमधून लोकांच्या लक्षात येतं की आपल्या मनात संताप आहे. कॉम्प्युटरच्या की-बोर्डवर जोराने टाईप करणं, फोन रागाने आदळणं, ड्रॉवर्स पटापट बंद करणं अशा गोष्टीतून मनातील राग व् यक्त होत असतो. ऑङ्खिसमध्ये आपलं अशा प्रकारचं वर्तन घातक ठरु शकतं.

त्यामुळे मनातल्या मनात धुसफुसण्याऐवजी राग निवळण्यासाठी वेळ द्या. ऑफिसमध्ये रोज घरुन टीफीन घेऊन जातो किंवा

कॅन्टीनमध्ये खातो. रोज रोज हे करणं कंटाळवाणं वाटतं. त्यापेक्षा एखाद्या दिवशी बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन का आखू नये? ऑफ िसच्या लंच अवरमध्ये सहकार्‍यांबरोबर जवळच्याच एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जावं. महिन्यातून दोन-चार वेळा असं केलं तर किती मजा येते ते पहा. बंदिस्त वातावरणापेक्षा अशा मोकळ्या वातावरणात मैत्रीचं नातं जास्त फुलतं.

ओंकार काळे
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

घरातील झाडू जास्त काळ टिकवण्यासाठी या ट्रिक नक्की अवलंबवा

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

भोगी विशेष रेसिपी : चविष्ट खिचडी

काळी उडीद डाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे का?

किशोरवयीन मुलींनी मेकअप आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Show comments