Dharma Sangrah

जाणून घ्या, विवाहानंतर का जावे हनिमूनला?

Webdunia
सोमवार, 23 जुलै 2018 (16:29 IST)
विवाहानंतर हनिमूनला जाणे हे प्रत्येकालाच आवडते. लग्नानंतरचे रिती-रिवाज पूर्ण झाल्यावर त्वरित याचे नियोजन केले जाते. पूर्वी देशातील एखाद्या ठिकाणाला पसंती दिली जात असे. परंतु, आजकाल अनेक जोडपी परदेशाची निवड करताना दिसत आहेत. काहीजण याकडे एक एंजॉय म्हणून पाहतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या रिलेशनमध्ये हे खूप महत्त्वाची भूमिका निभावते.
 
विवाह झाल्यानंतर दाम्पत्य बंधनात अडकतात, त्यांच्यावर घरातील मंडळी किंवा समाजाची काही बंधने येतात. तसेच घरात सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. यामुळे एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. परंतु, तुम्ही जेव्हा हनिमूनला जाता तेव्हा तेथे कोणाचेही बंधन नसते, एकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळतो. रिलॅक्‍स होण्यासोबत एकत्र वेळ घालविण्यास मिळतो. यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होते.
एकत्र वेळ घालविल्याने दोघांमध्ये आदराची भावना निर्माण होते. आयुष्यभर आपण एकमेंकाना कायम साथ देऊ, असे दोघेही आश्वासन देतात. एकमेकांना समजून घेण्यासाठी ही वेळ खूप परफेक्‍ट आणि महत्वाची आहे.
 
एकमेकांबद्दल माहिती मिळाल्याने, एकत्र वेळ घालविल्याने समजून घेण्यास अडचणी येत नाहीत.
ज्यावेळी आपण घरी कुटुंबासोबत तसेच मित्रांसोबत असताना त्यांच्यासोबत वेळ घालवता. त्यांच्याकडेच पार्टनरपेक्षा अधिक लक्ष असते. मात्र, हनिमूनच्या वेळी तुम्ही दोघच असता, त्यामुळे एकमेकांच्या आवडीनिवडी, पसंती-नापसंती याबाबत जाणून घेता येतात.
 
विवाहानंतर आपण प्रथम एकत्र बाहेर जात आहोत, ही आठवण मानाच्या कोपऱ्यात घर करणारी असते.
 
लग्नातील धावपळीमुळे विविध कार्यक्रमामुळे दोघेही थकलेले असतात. यामुळे थकवा दूर करण्यासाठी हनिमून हा चांगला पर्याय असतो.
 
ओनोख्या व्यक्तीशी एकरुप होण्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा ठरतो. याला प्रेम विवाह करणारे अपवाद ठरू शकतात. परंतु, आजही काही विवाह घरच्याच्या परवानगीने होतात. अशा दाम्पत्यांना भावनिकरित्या एकमेकांच्या जवळ येण्यास हे दिवस मदत करतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

वारंवार पाय सुन्न पडतात? शरीरात असू शकते या गोष्टीची कमतरता

फ्रिजमध्ये पीठ काळं पडतं? हा उपाय एकदा करून पहा

झोपताना उशीजवळ मोबाईल ठेवता? आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

आई-वडिलांच्या आशीर्वादाने बदलू शकतं तुमचं नशीब!

पु.ल. देशपांडे यांच्या कविता

पुढील लेख
Show comments