rashifal-2026

जपावे भावबंध

वेबदुनिया
पती किंवा पत्नी यांच्यापैकी एकाला दुसर्‍याच्या प्रामाणिकपणाविषयी संशय येत असेल तर हे नातं फार काळ चांगलं टिकत नाही. आयुष्याच्या जोडीदारांमध्ये गैरसमजांमुळे अविश्वास निर्माण होतो. जोडीदार आपली फसवणूक करतोय असं हळूहळू वाटायला लागतं. अनेकदा थोडय़ाशा बेपर्वाइनेही अविश्वास निर्माण होतो.पती-पत्नीचं नातं फार नाजूक असतं. छोटय़ा कारणांमुळेही या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. या नात्यामध्ये कायम गोडवा रहावा असं कोणाला वाटणार नाही? असं असलं तरी कधी तरी हे संबंध बिघडण्याच्या स्थितीत येतात. त्याची कारणं छोटी असतात. पण, कालांतराने या नात्यात बाधा येते. मनोविकार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पाच महत्त्वाच्या कारणांमुळे या नात्यात दुरावा निर्माण होतो. परस्परसंवादाची कमतरता हे त्यातील प्रमुख कारण आहे. दिवसभरात आपण काय केलं याबाबत पती-पत्नीमध्ये बोलणं होत असतं. पण, हे आपल्यातील चांगलं कम्युनिकेशन आहे असं मानणं योग्य ठरत नाही. पती-पत्नी शांतपणे बसून आपण पुढे काय करायचं ठरवलं आहे, आपली भविष्यातील स्वप्नं काय आहेत याची चर्चा करत आपले विचार शेअर करतात. त्यावेळी त्यांच्यामध्ये खर्‍या अर्थाने चांगलं कम्युनिकेशन घडतं. रोज थोडा वेळ काढून आपलं रुटीन, काम आणि मुलं असे मुद्दे वगळून एकमेकांशी संवाद साधला तर हे नाजूक संबंध मजबूत व्हायला मदत होते. चोवीस तासांपैकी परस्परांशी संवाद साधायला किमान तासभर तरी काढावा.

पती किंवा पत्नी यांच्यापैकी एकाला दुसर्‍याच्या प्रामाणिकपणाविषयी संशय येत असेल तर हे नातं फार काळ चांगलं टिकत नाही. आयुष्याच्या जोडीदारांमध्ये गैरसमजांमुळे अविश्वास निर्माण होतो. जोडीदार आपली फसवणूक करतोय असं हळूहळू वाटायला लागतं. अनेकदा थोडय़ाशा बेपर्वाइनेही अविश्वास निर्माण होतो. घरी यायला उशीर होणार असेल तर दोघांनीही एकमेकांना खरं कारण सांगावं. खोटं बोलण्यापासून नेहमी दूर राहिल्यास जोडीदाराच्या मनातील संशय वाढत जातो. परस्परांच्या भावनांबद्दल नेहमी संवेदनशील रहायला हवं. लग्नापूर्वीच्या संबंधांबाबत वारंवार बोलू नये. जोडीदार आपल्या सर्व मागण्या पूर्ण करेल असं समजू नये. आपली एखादी मागणी पूर्ण झाली नसेल तर नाराज होण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घ्यावं.
कांचन रिद्धी
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

प्रेरणादायी कथा : चला आनंद वाटूया

साखर विरहित खजूर ओट कुकीज; अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील

जागतिक महिला दिन २०२६: आई, बहीण, पत्नीला द्या हे खास गिफ्ट; स्टायलिश आणि अर्थपूर्ण सरप्राईज आयडिया

Childhood Obesity पालकांसाठी अलर्ट: भारत दुसऱ्या क्रमांकावर बाल लठ्ठपणात; महाराष्ट्रातही वाढती चिंता

पुढील लेख
Show comments