Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लव्ह अँट फस्ट साईट नाहीतर पैसा और पंगा

- अदिती नाईक

वेबदुनिया
लव्ह अँट फस्ट साईट असो, नाहीतर तिच्या प्रचंड नखर्‍यांनंतर आणि नकारांनंतर मिळालेला होकार असो.किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये अलगदपणे फुललेलं प्रेम असो.. आपण कशाप्रकारे प्रेमात पडतो हे महत्त्वाचं नाही; कारण प्रेमात पडणं तसं सोपं आहे; पण ते प्रेम निभावणं मात्र महाकठीण. एकमेकांना ‘पटवण्याच्या’ हजारो पद्धती तुम्हाला माहीत असतील; पण प्रेमात पडल्यानंतर ते प्रेम निभावणं. फुलवणं त्याचं काय.? ते जमतं तुम्हाला.? की ज्या नात्यावर मनापासून प्रेम केलं तेच नातं जगण्यावर उदास सावली धरतं. तसं कुणाचंचं होऊ नये. म्हणून प्रेमात पडल्यानंतर लक्षात ठेवण्याच्या १२ गोष्टी. प्रेमानं जगण्याच्या, जगवण्याच्या.!

१) कुठलंही नातं विश्‍वासावर अवलंबून असतं. प्रेमात पडल्यानंतर त्या दोघांमध्ये विश्‍वासाचं एक नातं तयार होतं. पण निर्माण झालेला विश्‍वास टिकवणं मात्र गरजेचं असतं. तेव्हा एकमेकांपासून कुठलीही गोष्ट लपवू नका. नात्यात जितकी पारदर्शकता असेल तितकं तुमचं नातं तुम्हाला आनंद देईल.
२) एकमेकांना कधीही गृहीत धरू नका. प्रेमात पडल्यानंतर होतं काय की समोरच्या माणसाबद्दल आपण पझेसिव्ह होत जातो. पण सतत एखाद्या माणसाला गृहीत धरलं गेलं तर त्यातून नाराजी निर्माण होऊ शकते.
३) प्रेमात पडलो आहोत म्हणजे सतत गोड-गोडचं बोलू, असं काही होत नाही. समोरच्यानं आपल्यापेक्षा निराळं मत मांडलं तरी ते ऐकण्याची, समजून घेण्याची आणि आपल्या मतापेक्षा ते अधिक योग्य असल्याचं लक्षात आलं तर अमलात आणण्याची तयारी असली पाहिजे. अनेकदा होतं काय की मत ऐकून घेतलं जातं; पण निराळं असेल तर त्यावर भांडणं होतात.
४) सतत ‘आय लव्ह यू’ म्हटलं नाही तरी आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी आहे हे आपल्या कृतीतून व्यक्त झालंच पाहिजे. एखादं छोटंसं गिफ्ट किंवा एसेमेस किंवा भेट झाल्यानंतर मोकळं हास्य यातूनही ही गोष्ट व्यक्त होऊ शकते. प्रेम आहे पण दाखवायचं नाही, अशी काही जणांना सवय असते.
५) अनेकदा पझेसिव्हनेस इतका वाढतो की आपल्या प्रिय व्यक्तीच्या इमेल आणि सोशल नेटवर्किंग साईटचे पासवर्ड मागितले जातात. तुमचं खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर पासवर्ड मागू नका. आपण प्रेमात पडलो म्हणजे आपली आयुष्य एक झाली असं होत नाही.
६) अनेक प्रेमप्रकरणे मोडतात ती इगोमुळे. त्यामुळे रागवा, भांडा अगदी अबोले धरा पण शेवटी सारं विसरून एक व्हा. तरंच नातं निभावणं सोपं जाईल.
७) प्रेम आहे म्हटल्यावर एकमेकांची ओढ वाटणार. पण प्रेम आहे म्हणजे शरीरसंबंध झालाच पाहिजे असं काही नाही. त्यामुळे जवळीक असली तरी त्यापुढे जाऊन शरीरानं एकत्र येण्याचं शक्यतो टाळा.
८) प्रेमात पडला आहात म्हणजे आता मिठी मारलीच पाहिजे, चुंबन घेतलंच पाहिजे असं काही नाही. तुमच्या जोडीदाराची याबद्दलची मतं समजून न घेता स्वतच्या भावना त्याच्यावर लादण्याची चूक करू नका.
९) तुम्ही एकत्र फिरलात की चार लोकांना त्याबद्दल समजणार. चर्चा होणार. गॉसिपही होणार. पण आपल्या प्रेमावर विश्‍वास ठेवून आहे त्या निर्णयावर ठाम राहा. मात्र, आपलं प्रेम बदनाम होईल असं चारचौघात वावरणं म्हणजे स्वातंत्र्य आहे.
१0) भटका, सिनेमे टाका, पावसात चिंब भिजा, लाँग ड्राईव्ह वर जा..मज्जा करा. पण जरा डोकं ठिकाणावर ठेवून, नाहीतर आपली शोभा व्हायची समाजात.
११) एकमेकांची आर्थिक स्थिती समजून घेणं जरुरीचं आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघंही एकाच आर्थिक गटातले असाल असं नाही. एकमेकांना आर्थिक गटावरून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे डिवचू नका. महागडी गिफ्टस्, शॉपिंग, डिस्को आणि तत्सम गोष्टींसाठी जोडीदाराने पैसा पुरवावा अशी अपेक्षा का करायची.? विशेषत मुली. गिफ्ट म्हणजे प्रेम नव्हे.
१२) जे करायचं ते मदमुराद. मोकळेपणानं. दिलखुलासपणे करा, पण कमिटमेण्ट पाळा. प्रेम म्हणजे जबाबदारी, तो स्वीकारता यायला हवी.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

Show comments