Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्त्रियांना का आवडतात वयाने मोठे पुरूष

Webdunia
एखाद्या रिलेशनमध्ये पडल्यावर स्त्री लवकर सीरियस होऊन जाती पण पुरूष मात्र जबाबदारी घेयला घाबरतात. अशाने रिलेशनशिप जास्त दिवस टिकून राहत नाही आणि बहुतेक अशा काही कारणांमुळेच स्त्री समान
वयोगटाच्या पुरूषांसह रिलेशन बनवण्यापेक्षा आपल्याहून वयाने मोठ्या पुरूषांकडे आकार्षित होते. पाहू अशा पुरूषांमध्ये काय गुण असतात की स्त्रिया त्यांच्याकडे अधिक आकर्षित होतात...
 
हाऊ टू ट्रीट वूमन
वयाने मोठ्या पुरूषांमध्ये स्त्रियांना आवडणार्याअ सवयी जसे कारचं दार उघडणे, रेस्टॉरंटमध्ये बसण्यासाठी आधी तिला ऑफर करणे, आपली गोष्ट प्रामाणिकपणे मांडणे व इतर असतात. याव्यतिरिक्त मॅच्योर पुरूषांना माहीत
असतं की डेटवर कोणत्या गोष्टी स्त्रियांना आकर्षित करू शकतात किंवा कोणत्या गोष्टी अवॉयड करायला हव्या.
 
स्थिर
स्त्रीपेक्षा मोठे असलेले पुरूष फिजिकली आणि मेंटली स्थिर असतात. ते उगाच बंधनं घालत नसून पजेसिवही नसतात. लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करून ते माफ करण्यासाठी वेळ घेत नाही.
आर्थिकदृष्ट्या मजबूत
अशा पुरूषांच्या करियरबद्दल बघायला गेलं तर ते सेटल्ड असतात. यामुळे स्त्रिया आर्थिक दृष्टीने टेन्शन फ्री असतात. याव्यतिरिक्त त्यांना मोठ्या पदावर असलेल्या माणसांबरोबर फिरायला आवडतं. अशाने त्यांची ओळख मोठ्या मोठ्या लोकांशी होते जी तिच्या करिअरच्या दृष्टीनेदेखील फायदेशीर ठरतं.
 
आत्मविश्वासी
वयाने आणि मोठ्या पदावर असलेले पुरूष आपल्या लुक्स आणि स्टाइलबद्दल आत्माविश्वासी असतात. त्यांना हे ही माहीत असतं की स्त्रीशी कोणत्या विषयावर बोलण्याने ती खूश राहील. आणि मग डेटवर ते तसेच वागतात.
 
ठाम मताचे
रिलेशनशिप असो वा लग्न, मॅच्योर पुरूषांचा दृष्टिकोन स्पष्ट असतो की त्यांना काय करायचे आहेत. स्त्रिया कित्येक वेळी इमोशनल होऊन जातात पण अशा पुरूषांना माहीत असतं की परिस्थितीला तोंड कसं देयचं आहेत. ते स्वतः आपल्या मतावर ठाम असतात आणि स्त्रियांनाही आपलं मत पटवून देण्यात पटाईत असतात.
आकर्षक सरप्राइज
हे पुरूष टीनएजर्स सारखी मस्ती करू शकत नसले तरी त्यांना हे चांगलंच माहीत असतं की स्त्रियांना खूश कसं करायचं. ते असे काही गिफ्ट्स आणि सरप्राइजेस ‍देतात की कोणतीही स्त्री त्याच्यात आपोआप गुंतली जाते. 
त्यांचे गिफ्ट आयडियाज इतके क्लासी असतात की ते न आवडण्याचं तर प्रश्नच उद्भवत नाही.
 
सुरक्षेची भावना
जेव्हाही स्त्री स्वतः: च्या सेफ्टीबद्दल विचार करते तेव्हा ती मॅच्योर पुरूषांची निवड करते. कारण की ते फिजिकली आणि मेंटली स्ट्राँग असतात. कोणत्या परिस्थितीला कसं सामोरे जायचे याचा त्यांना अनुभवही असतो आणि
नसला तरी ते त्या परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जातात.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

घरातील झाडू जास्त काळ टिकवण्यासाठी या ट्रिक नक्की अवलंबवा

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

भोगी विशेष रेसिपी : चविष्ट खिचडी

काळी उडीद डाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे का?

किशोरवयीन मुलींनी मेकअप आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Show comments