Festival Posters

जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बाहेर जात असाल तर असे करणे टाळा

Webdunia
शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (11:59 IST)
एखाद्या पार्टीला जाणे किंवा आपल्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याने केवळ तुमचा मूड रिफ्रेश करत नाही, तर ते तुमचे नातं देखील मजबूत करतं. एकत्र वेळ घालवणे देखील आपल्याला आपल्या जोडीदाराच्या जवळ आणतं. महिन्यातून २-३ वेळा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आपण पार्टी, डिनर किंवा छोट्या सहलीला जायला हवे. सहसा, जोडीदारासोबत जाणे प्रेम आणि नातेसंबंधासाठी सकारात्मक असते, परंतु काहीवेळा असे घडते की काही गोष्टी नकळत घडतात, ज्यामुळे तुमच्यामध्ये अंतर येऊ लागते, म्हणून तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
 
आपल्या जोडीदारापासून जास्त काळ दूर राहू नका
पार्टीत इतरांना भेटणे सामान्य बाब आहे तरी आपल्या जोडीदारापासून फार काळ दूर राहू नका. खासकरून जर तुमचा पार्टनर तुमच्या ओळखीच्या लोकांच्या पार्टीला आला असेल तर हे अजिबात करू नका. यामुळे त्यांना एकटेपणा किंवा कंटाळा येऊ शकतो.
 
आपल्या मित्रांशी परिचय
असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या मित्रांना त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांशी परिचय देत नाहीत. असे केल्याने, त्याच्या शेजारी उभी असलेली कोणतीही व्यक्ती अस्वस्थ होऊ शकते. विशेषतः तुमच्या जोडीदाराला तुमचे वर्तन खूप विचित्र वाटेल.
 
सोबत न खाणे
प्रत्येक गेदरिंगमध्ये मित्र आणि कुटुंबातील सदस्यांचे असणे साहजिक आहे परंतु याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जोडीदाराला एकटे सोडून द्या आणि इतर कोणाबरोबर डिनर किंवा लंच करायला सुरुवात करा. जर तुम्हाला मित्रांसोबत जेवायची इच्छा असेल तर तुमच्या जोडीदाराला नक्कीच आमंत्रित करा.
 
वाईट बोलणारा पार्टनर 
कधीकधी असे होते की एखाद्याच्या जोडीदाराच्या बोलण्यामुळे तुमचा मूड खराब होतो, परंतु प्रयत्न करा की काहीही असो, घरी येऊन ते करा. पार्टीत किंवा बाहेर जोडीदाराला कोणासमोर वाईटसाईट बोलू नये किंवा त्यांच्याशी वाईट वागू नये. करू नका.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

उपवास स्पेशल शिंगाड्याचा शिरा

हिवाळ्यात छातीत दुखणे ही एक धोक्याची घंटा आहे का? त्याकडे दुर्लक्ष करू नका

BEL मध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता होण्याची शेवटची संधी, पात्रता जाणून घ्या

हिवाळ्यात चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर या 5 गोष्टी हळदीमध्ये मिसळून लावा

थंडीत आरोग्याची काळजी घ्या, या 5 टिप्स वापरून पहा

पुढील लेख
Show comments