साहित्य-
500 ग्राम- बोनलेस चिकन
एक मोठा चमचा - आले लसूण पेस्ट
अर्धा चमचा- तिखट
एक चमचा- लिंबाचा रस
एक छोटा चमचा हळद
अर्धा चमचा चॅट मसाला
दोन चमचे बेसन
एक चमचा कसुरी मेथी
दोन चमचे तेल
एक चमचा दही
चवीनुसार मीठ
कृती-
सर्वात आधी चिकनचे तुकडे स्वच्छ धुवून कोरडे करण्यासाठी ठेवावे. चिकनचे कोरडे झाले की मसाला तयार करावा. आता एका भांड्यात दही, मीठ, लिंबाचा रस, बेसन, कसुरी मेथी, सर्व मसाले आणि मोहरीचे तेल घालून मिक्स करावे. आता त्यात चिकनचे तुकडे घालावे. व झाकून 2 तास फ्रीजमध्ये ठेवावे. मॅरीनेट केल्यानंतर चिकन लाकडाच्या काडीवर सेट करण्यासाठी ठेवावे. नंतर ग्रिल पॅनला थोडे तेल लावून ग्रीस करावे. आता तयार केलेल्या काड्या एकामागून एक तव्यावर ठेवा आणि मंद आचेवर 10 मिनिटे भाजून घ्याव्या. आता चिकन टिक्का शिजल्यावर ताटात काढावे. तर चला तयार आहे आपले चिकन टिक्का रेसिपी, हिरवी चटणी आणि कांद्याच्या कोशिंबीर बरोबर नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik