साहित् य : 500 ग्रॅम मटण कुकरमध्ये शिजवून घेतलेले, २५० ग्रॅम तूप, 200 ग्रॅम दही, २०० ग्रॅम कांदा, १० ग्रॅम आलं, 3 लहान चमचे धने पूड, २ लहान चमचे तिखट, ३/४ लहान चमचा मीठ, ४-५ तमालपत्र, १/२ वाटी साबूत गरम मसाला (जिरा, काळे मिरे, छोटी वेलची, लवंग, जायफळ, जावीतरी).
कृती : 1 कांदा कापून वेगळे ठेवावा. उरलेला कांदा, आलं, धने पूड व तिखट मिसळून वाटून घ्यावे. तूप गरम करून त्यात कापलेले कांदे व मटण तूपमध्ये परतून घ्यावे.
गरम तुपात साबूत गरम मसाला व तमालपत्र टाकावे व त्यात वाटलेले साहित्य घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. त्यात नंतर दही घालून चांगले परतावे. व शिजलेले मटण आणि मीठ घालून एकजीव करावे. दीड ते दोन कप पाणी घालून कुकरामध्ये 10 मिनिट शिजवावे. गरम गरम सर्व्ह करावे.