Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सांग आरशा-मी दिसते कशी?

- डॉ. अमला गोडे

Webdunia
माझ्याकडे आहे एक आरसा-
रोज त्याला मी विचारते, सांग आरशा मी दिसते कशी? ।।1।।

आरसा म्हणतो -
'' निरागस गोरी गोबरी - बाळसेदार
कानी कुंडल मोतीहार - वाटते जशी बार्बी डॉल'' ।।2।।

सांग आरशा मी दिसते कशी? आरसा म्हणतो -
नजर बावरी - भिरभिरी - चेहऱ्यावर रोज नवी पुटकुळी,
कोणाचा विचार करते गं? अशी कशाला लाजते गं? ।।3।।

ND
सांग आरशा मी दिसेन कशी? आरसा म्हणतो -
'' नजर लाजरी गाली लाली - मागे पुढे आरशामध्ये
मुरडून पाहते - कोणाची गं वाट पाहते. '' ।।4।।

सांग आरशा मी दिसेन कशी? आरसा म्हणतो -
'' गळ्यात काळी पोत, तुझ्या भांगामध्ये सिंदूर साजे
तुझ्या मागे आरशामध्ये - कोण रोज दिसते गं? '' ।।5।।

सांग आरशा मी दिसते कशी? आरसा म्हणतो -
'' कडेवरची छोटी बाळी - गोली गोबरी बाळसेदार
वीसच वर्ष झाली गं-तुलाच पुन: : पाहतो का? '' ।।6।।

पण आजकाल मीच म्हणते -
'' आरशा - आरशा - थांब जरा -
माझ्या बळीला मी न्हाऊ घालते दूध देते
माझ्या बाळीचा ला अंगाई गाते
सांगू नको रे - मी दिसते कशी
ऐकण्यापुरताही वेळ नाही
आरशा - आरशा थांब जरा।। 7।।

साभार : महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर यांच्या मालविका स्मरणिकेतून

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

कॅन्सरबद्दल लवकर कळेल, स्ट्रँडचे नवीन जीनोमिक्स डायग्नोस्टिक्स अँड रिसर्च सेंटर सुरू

Wedding Wishes in Marathi लग्नाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश

Dinner Special : पंजाबी छोले रेसिपी

Food to Reduce Cholesterol कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी काय खावे

मसूर फ्राइड डाळ रेसिपी

Show comments