Marathi Biodata Maker

बाप माझा विठ्ठल विठ्ठल

Webdunia
सोमवार, 19 जुलै 2021 (13:58 IST)
बाप माझा विठ्ठल विठ्ठल
जाडे भरडे कपडे घालून
दाळ-दाणा आणतो
बाजार संपून जाऊसतोर
बाप चकरा हाणतो
 
बैल होतो हमाल होतो
कष्ट उपसतो खूप
बाप म्हणजे काळसावळ
विठलाचं रूप
 
ऊन नाही तहान नाही
दिवस रात्र राबतो
घर जातं झोपी पण
बाप एकटा जागतो
 
लेकराच्या भल्यासाठी
अपमान गिळत राहतो
पाटी आणि पेन्सिलकडे
बाप एकटक पाहतो
 
पोराच्या डोक्यावरून
फिरवतो झोपित हात
खुशाल ठेव देवा म्हणून
जोडीत राहतो हात
 
दिसतो तेवढा बाप कधीच
कठोर रागीट नसतो
खरं सांगतो बाप म्हणजे
आईचंच रूप असतो
 
घळा घळा आसवं गाळून
मोकळी होते माय
 
दुःख दाबून बाप दाबतो
सावकाराचे पाय
 
हो म्हणतो लेकरासाठी
पडेल ते काम करील
त्याला साहेब करण्यासाठी
मी नाच करील
 
खिळे काटे दगड गोटे
पायात घुसत जातात
अंधारात त्याच्या वेदना
पाणी पाणी होतात
 
कसं होईल काय होईल
चैन पडत नाही
बाप नावाचा संत कधी
दिवसा रडत नाही
 
फादरचा " डे " फक्त
वर्षातून एकदा असेल का ?
बैल गोठ्यात बसल्यावर
शिवार हिरवं दिसेल का ?
 
सारं दुःख पोटात गिळून
मानेवर " जू " घेतो
तोंडातून रक्त आलं तरी
गाडा ओढीत राहतो
 
रक्ताचे थेंब दिसूने म्हणून
तोच टाकतो माती
बाप ज्याला कळतो त्याची
फुटून जाती छाती
 
आमच्यासाठी काय केलं
असं विचारू नका
म्हाताऱ्या बैलावर
वार करू नका
 
बापाची तिरडी उचलण्या आधी
पोरांनी शहाणं व्हावं
बाप माझा विठ्ठल विठल
भजनी ठेक्यात गावं
 
प्रा.विजय पोहनेरकर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

पान गुलकंद सरबत उन्हाळ्यासाठी एक अतिशय थंड आणि सुगंधी पेय

रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी दररोज किती चालावे

युनियन बँकेत पदवीधर तरुणांसाठी १८६५ पदांसाठी भरती, त्वरा करा, पात्रता, वेतनमान जाणून घ्या

उन्हाळ्यात घामामुळे तुमचा मेकअप खराब होण्यापासून कसा रोखायचा? टिप्स जाणून घ्या

घरीच गुलाबपाण्याचे आईस क्यूब्स बनवा, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणा…

पुढील लेख
Show comments