rashifal-2026

गदिमा- पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी

Webdunia
बुधवार, 29 जून 2022 (17:17 IST)
पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी
 
घराघरांचे दुर्ग झुंजवू, झुंजू समरांगणी ॥धृ०॥
 
अष्‍टभुजेच्या वंशज आम्ही, महिषासुर मारु
 
देवत्वाच्या गुढया उभारु, दानव संहारु
 
वलय होउनी वज्र नांदते, आमुच्या कर कंकणी ॥१॥
 
रणधीरांच्या सन्निध आम्ही स्फूर्तीसह राहू
 
रथचक्राच्या आसाठायी घालू निजबाहू
 
घडवू रामायणे, शत्रुचा मद उतरु रावणी ॥२॥
 
शस्‍त्रहि दिसते शोभुन आमुच्या शोभिवंत हाती
 
भौम मातता चारु त्याला सैन्यासह माती
 
स्त्रीहट्टाच्या बळे बहरवू स्वर्गसुखे अंगणी ॥३॥
 
रणयागांतरी सर्वस्वाच्या आहूती टाकू
 
अभिमन्यूंच्या बसू रथावर, अश्‍वाते हाकू
 
सती उत्‍तरेपरी आवरु डोळ्यांतच पाणी ॥४॥
 
जिजा, अहिल्या, झाशीवाली आमचीच रुपे
 
सुताऽवतारे जितली युद्‌धे अमुच्या संतापे
 
आ-शशितरणी स्वतंत्र राखू भारतीय धरणी ॥५॥
 
 
ग.दि. माडगूळकर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

Subhash Chandra Bose Jayanti नेताजी सुभाष जयंती भाषण मराठीत

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

माघी गणेश जयंती निमित्त बाप्पाला अर्पण करण्यासाठी पारंपारिक आणि खास पाककृती

सुंदर त्वचेसाठी लावा हे स्ट्रॉबेरी मास्क

चिंता करणे थांबवण्यासाठी Scheduled Worry Time पाळा

पुढील लेख
Show comments