Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती

Webdunia
मंगळवार, 2 एप्रिल 2024 (20:19 IST)
काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती
धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिवळे सजले
आले लोणचे बहु मुरलेले, आणि लिंबू रसरसलेले
किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले
 
खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले
चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले
मिरची खोबरे ती सह ओले, तीळ भाजूनी त्यात वाटले
कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले
 
वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले!
भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या
काही वाटुन सुरेख तळल्या, कोशिंबिरी च्या ओळी जमल्या
शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या 
 
केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या
एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी
रान कारली वांगी काळी, सुरण तोंडली आणि पडवळी
चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी
 
फणस कोवळा हिरवी केळी, काजुगरांची गोडी निराळी
दुधी भोपळा आणि रताळी, किती प्रकारे वेगवेगळी
फेण्या, पापड्या आणि सांडगे, कुणी आणुनी वाढी वेगे
गव्हल्या नकुल्या धवल मालत्या, खिरी तयांच्या शोभत होत्या
 
शेवयांच्या खिरी वाटल्या, आमट्यांनी मग वाट्या भरल्या
सार गोडसे रातंब्याचे, भरले प्याले मधुर कढीचे
कणीदार बहू तूप सुगंधी, भात वाढण्या थोडा अवधी.........
 
कवी : ग. दि. माडगुळकर

संबंधित माहिती

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

तुम्ही निरोगी आहात की नाही हे कसे ओळखावे? आयुर्वेद निरोगी राहण्यासाठी हे 5 चिन्हे सांगते

शनि साडेसाती चिंतन कथा

Sleep Divorce कपल्समध्ये स्लीप डिव्होर्सचा ट्रेंड, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Chilled Beer फक्त थंडीतच बिअरची चव चांगली का लागते? याचे कारण संशोधनातून समोर आले

पुढील लेख
Show comments