suvichar

सुखाची रेसीपी

Webdunia
सोमवार, 22 एप्रिल 2019 (16:18 IST)
सुुुख
किती सहज म्हणतोस रे ...
म्हणे एक प्लेट सुख आण पट्कन ..........
बाजारात जा आणि 
सहनशक्ती घेऊन ये बरं झटकन .........
असे काही नसते रे बाबा.
 
सुखाची रेसीपी
भिजत घालेन काही वेळ
संयमाच्या पाण्यात.
बांधून घालेन काही काळ 
घट्ट ओठांच्या फडक्यात.
 
दुर्लक्षाच्या उबेमध्ये 
छान मोड येतील.
सुखाचे ताजे ताजे 
कोंब दिसू लागतील.
 
माया आणि आपुलकीचा
फर्मास मसाला.
कष्ट आणि मेहनतीचा 
खर्डा घालू चवीला.
 
परस्पर स्नेहाचं 
खोबरं घालू छानसं.
बंधन आणि मर्यादांचं 
मीठ घालू इवलुसं.
 
साखरपेरणी करू थोडी
गोड गोड शब्दांची.
कोथिंबीर घालू थोडी
आस्था आणि समजुतीची.
 
कटू शब्द, राग, लोभ
चुलीमध्ये घालू.
स्वार्थ आणि गैरसमज 
भाजूनच काढू.
 
तयार झाली डिश आपली
सजवायला घेऊ.
तृप्ती आणि कौतुकाची 
साय घालू मऊ.
 
बघितलंस ??
सुख ही डिश नाही
एकट्याने शिजवायची,
सर्वांनीच रांधायची नि सर्वांनीच मिळूनच खायची..

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

चेहऱ्याची सैल त्वचा कशी घट्ट करावी

जातक कथा : राजा आणि गिधाडाची भेट

झोपण्यापूर्वी लहान वेलची चघळल्यास तुम्हाला तुमच्या शरीरात हे बदल दिसून येतील

उन्हाळ्यात दुपारी पिण्यासाठी एक उत्तम रिफ्रेशिंग ड्रिंक Litchi Lemonade

उन्हाळ्यात काळे कपडे घालणे नेहमीच चुकीचे असते का? 'हा' एक अपवाद तुम्हाला माहीत आहे का?

पुढील लेख
Show comments