Dharma Sangrah

लेक आली माहेराला

Webdunia
बुधवार, 20 जानेवारी 2021 (14:22 IST)
माहेरी आलेल्या लेकीच्या आईचे मनोगत......

लेक आली माहेराला
सुनबाई नीट वागा...
दोन दिसांची पाहुणी
राग राग करु नगा

आली थकून भागून 
नको सांगू काही काम...
माहेराच्या सावलीत 
तिला करु दे आराम 
 
फार मनाची हळवी
बोलू नको शब्द उणा...
राख तिचा मान-पान
दिसू दे तुझा मोठेपणा 
 
लेक आली माहेराला
कर काही गोडं-धोडं...
जिरे-साळीच्या भाताला
तूप वाढ लोणकढं
 
कर खमंग काहिसं
दुपारच्या फराळाला...
फार आवड फुलांची
धाड निरोप माळ्याला
 
आणि लिंबाच्या झाडाला 
देई झोपाळा टांगून...
तिचे बालपण तिला 
भेटल हिंदोळे घेऊन
 
लेक चालली सासरी
जीव होइ माझा हूरहूर...
मुरडीचा कानवला
गव्हल्याची कर खीर
 
ओटी भर, हाती देई
खण जरीच्या काठाचा...
दही घाल हातावर 
टांगा थांबला केव्हाचा
 
थकला गं माझा जीव 
हात-पाय उचलेना...
तूच आता तिची "आई"
जप माझी भोळी मैना
 
- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : हुशार ससा

Saturday Born Baby Girl Names शनिवारी जन्मलेल्या मुलींसाठी नावे

शिंगाडयांची लागवड करतांना शेतकरी त्यांच्या शरीरावर इंजिन ऑइल का लावतात? माहिती आहे का तुम्हाला?

Republic Day 2026 Speech in Marathi प्रजासत्ताक दिनावर भाषण मराठीत

तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये अन्न न झाकता ठेवता का? धोके जाणून घ्या

पुढील लेख
Show comments