Festival Posters

व्यथा एका "ती" ची

Webdunia
गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (16:38 IST)
गृह प्रवेश करून येते घरी "ती",
एका क्षणात विसरून जाते कोण होती ती
 
सुरू होत नवं जीवन,एका अनोळखी विश्वात,
नवीन नजरा तिच्या अवती भवती फिरतात,
 
तिला चालण्या बोलण्यातुन परखतात,
काहीतरी आपआपले अंदाज बांधू लागतात,
 
सगळ्या शक्तीनिशी आव्हान पेलते "ती"
कुचकट टोमण्यात, कुठंतरी
असतेच "ती"
 
जुनी होतं जाते, आव्हान 
स्वीकारत स्वीकारत,
प्रत्येक नातं आपल्या परी 
छान जोपासत,
 
कित्ती ही रमली तरी,
परक तिला करतात,
वेळ आली की "तिला"काही सांगू नको म्हणतात,
 
तरीही आलेलं प्रत्येक संकट, 
तीच झेलते कुशलतेनं,
मार्ग काढत नेते संसार, आत्मीयतेनं,
 
समजतं नाही तिला असें का बरें होतं?
आपलंच म्हणवणाऱ कधी 
आपलं का नसतं? 
 
       अश्विनी थत्ते .
        नागपूर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात मेकअप टिकत नाही,या सोप्या टिप्स अवलंबवा

उन्हाळ्यात पोटाच्या त्रासाने त्रस्त आहात का? ते कसे टाळावे ते जाणून घ्या

बाळाला आंघोळ घालताना या चुका करणे टाळा

लघु कथा : लांडगा आणि कोकरूची गोष्ट

Happy Journey Wishes in Marathi प्रवासाच्या शुभेच्छा मराठी

पुढील लेख
Show comments