येईल साठी, येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता. वय झालं म्हातारपण आलं, उगाच कोकलत बसायचं नाही. विनाकारण बाम लावून, चादरीत तोंड खुपसायचं नाही. तुम्हीच सांगा छंद जोपासायला, वयाचा संबंध असतो कां ? रिकामटेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो कां ?...