Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 20 April 2025
webdunia

अस्ताचा सूर्य बघता, जीवात होई घालमेल

marathi poem sunset
, शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (19:51 IST)
अस्ताचा सूर्य बघता, जीवात होई घालमेल,
दिनकरा चा निरोपाची, निघे ह्रदयात सल,
मन उगाच कातर होई, वाटे कावरेबावरे,
मनाची ही अवस्था होण्यास, काय कारण असावे बरे?
पण सूर्योदय बघता, मन पुन्हा भरारी घेते,
नव्या कल्पनेला अजून धुमारी फुटते,
उत्साह संचारतो, त्या तेजोवलयाला बघून,
नवं काव्यही स्फुरते मज, रविराजाला पाहून!
..अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रात्रीच्या जेवणात या 8 भाज्या मुळीच खाऊ नये