Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॅग कशी भरायची ?

Webdunia
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (13:59 IST)
आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी 
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे ! 
फापट पसारा आवरून सारा, 
आता सुटसुटीत व्हायचं आहे !
 
याच्या साठी त्याच्या साठी, 
हे हवं, ते हवं 
इथे तिथे - जाईन जिथे, 
तिथलं काही नवं नवं 
हव्या हव्या चा हव्यास आता 
प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे, 
बॅग हलकी स्वतः पुरती 
आता फक्त ठेवायची आहे ! 
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे ! 
 
अपेक्षांच्या ओझ्याखाली 
आजवर त्रस्त होतो.
आयुष्याच्या होल्डॉल मध्ये काय काय कोंबत होतो !
किती बॅगा किती अडगळ !
साठवून साठवून ठेवत होतो 
काय राहिलं, कुठे ठेवलं 
आठवून आठवून पाहत होतो 
त्या त्या वेळी ठीक होतं 
आता गरज सरली आहे, 
कुठे काय ठेवलंय ते ते 
आता विसरून जायच आहे.
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे ! 
 
खूप जणांनी खूप दिलं 
सुख दुखाःचं भान दिलं 
आपण कमी पडलो याचं 
शल्य आता विसरायचं आहे !
मान, अपमान, ‘मी’,‘तू’
यातून बाहेर पडायचं आहे !
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे !
 
आत बाहेर काही नको 
आत फक्त एक कप्पा, 
जना - मनात एकच साथी 
सृष्टी करता एकच देवबाप्पा ! 
सुंदर त्याच्या निर्मितीला 
डोळे भरून पाहायचं आहे !
रिक्त -मुक्त होत होत 
अलगद विरक्त होत जायचं आहे.
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे !
 
- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

स्वादिष्ट मटार कोफ्ते रेसिपी

पोट खराब असताना कॉफी प्यावी का? चला त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेऊया

Career in MBA in Airport Management : एअरपोर्ट मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

झोपताना केस बांधून ठेवणे योग्य आहे का?तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे

तुम्हाला मधुमेह नाही पण तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते कारणे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments