अपेक्षा अपेक्षा अपेक्षा अपेक्षांचे एक मोठे जाळे घेऊन वावरत असतो भोळा माणूस उद्याच्या उगवत्या सूर्याची सोनेरी किरणे निश्चितच करतील सुंदर फुलांची उधळण टपोरी टपोरी सुंगधी फुलं अपेक्षांची मोहक रंगीबेरंगी फुलं समीराच्या झोक्यावर डोलणारी फुलं वेलीवर वृक्षावर फुललेली फुलं सडाच सडा शिंपलेला फुलांचा वाकून उंचावून तोडूया म्हटलं तर कधी उंचावलेली टाच पडते कमी तर कधी गोळा केलेली सड्यातली फुलं कुणितरी येऊन परडीतून हिसकावून घेतं आणि होते केवळ उपेक्षा
ND
ND
सार्या अपेक्षांची उपेक्षा आणि होतात सार्या अपेक्षा भंग अपेक्षाभंगाचे दु:ख नाही पेलवत ह्या भोळ्या भाबड्या माणसाला तेव्हा नको तो अपेक्षाभंग नको त्या अपेक्षा