Festival Posters

आजचा दिवस

- सौं.स्वाती दांडेकर

वेबदुनिया
WD
आजचा दिवस ताजा असतो,
विचार करायला मोकळा असतो

उद्या तो शिळा होणार, भूतकाळात जमा होणार
हातातल्या वाळू गत निसटुन जाणार
कालचा दिवस उद्या इतिहास होणार ..१..

आजचा दिवस वर्तमान आहे
ईच्छा, अपेक्षा, पूर्तिचा संसार आहे
भविष्याचा आधार आहे
आशेची किरण अन उमेदिची सकाळ आहे
विश्वासाचा भक्कम पाया अन
सायंकाळची निवांत सांजवात आहे
आजचा दिवस फक्त माझा आहे ..२..

आजचा दिवस देवान दिलेल नव जीवन आहे
जीवनाच कोर पान पुन्हा माझ्या समोर आहे
कतृत्वाच्या लेखणीन मनाजोग भरायच आहे
आजचा दिवस फक्त माझा आहे ..३..

माझा दिवस मला घडवायचा आहे
कतृत्वाच्या कसोटीवर पारखायचा आहे
विश्वासाच्या बळावर उजळावयाच आहे
आशेच्या पंखांनी फुलवायच आहे
दुसर्‍याचा मार्ग प्रशस्त करायचा आहे
वाटेवरचा दगड नाही निवा.याच वृक्ष बनायच आहे
माझा आजचा दिवस मला जगायचा आहे
आठवणींच्या बागेत फुलवायचा आहे
माझा आजचा दिवस
मला जगायचा आह े.
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

Palak Paneer Samosa Recipe ताईचा वाढदिवस आहे का? तर पालक पनीर समोसा बनवून द्या सरप्राईज

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनिअर मध्ये कॅरिअर करा

सुंदर गुलाबी नेल आर्टने तुमच्या हातांचे सौंदर्य वाढवा

झोपण्यापूर्वी हे एक तेल तुमच्या नाभीला लावा; शरीराच्या अनेक समस्या नाहीशा होतील

Show comments