Festival Posters

पाऊस

शशीन् वरधावे

Webdunia
ND
किती पहावी मी वाट
असाची येतो पाऊस
साता जन्मांची अशी
माझी पुरविण्या हौ म

कधी पडे तो अखंड
कधी जरा ना टिपुस
असा खेळी लपंडाव
माझा प्रेमळ पाऊस

कधी बनतो खट्याळ
कधी पडे सोसाट्यात
जशी नभातून व्हावी
शुभ्रमोत्यांची बरसात

त्याचे झेलिता तुषार
काया मोहरुनी जावी
मग नभातील वीजही
नसानसांतून खेळावी

लक्षलक्ष हे बीजांकुर
असे फुटावे झाडाला
जसे सारे पडून उरावे
जळ सोसेना मातील ा

असा हे वेडा उनाड
कधी वागे छान नीट
हळूवार मग दोन थेंब
देई रित्या ओंजळीत

असा लबाड पाऊस
क्षणभर तरी थांबावा
चिंब भिजले चराचर
मग घेतील विसावा

मोरपिसा स्पर्शासमान
त्याचा फिरताना हात
स्वर्गातून खाली यावा
कुणी दिव्यतेज देवदूत
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

Dry Fruit Cake वाढदिवस निमित्त घरीच बनवा शाही ड्राय फ्रूट केक पाककृती

चेहऱ्यावर बॉडी लोशन लावण्याचे तोटे

पोटदुखी या 5 गंभीर समस्या होऊ शकतात

इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन कोर्स मध्ये कॅरिअर करा

प्रेरणादायी कथा : योग्य आकलन

Show comments