Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्राजक्ताचा सडा

स्व. सौ. मीना आठल्ये

Webdunia
NDND
प्राजक्ताच्या पनोपानी ‍कितिक सजल्या बघ कलिका
केशरी लेंग खालती आणिक वरती धवल पहा बुरखा

हिरव्या काळ्या मखमालीवर फुले पसरली मुक्तपणे
प्राजक्ताचा गंध उधळुनी समीर नेतो धुंदपणे

आकाशाशी हितगुजणार्‍या कळ्या पाहती धरणीला
बहरील फुले सडा घालुनी गंधित करती मातील ा

उद्या आम्हीही अशी सुगंधी वृष्टी सुंदर करणार
परडीत झुलुनी हांसत जाऊनी श्रीकृष्णाला पूजणा र

स्वप्नामध्ये रात्र संपली अरूण हलके जागवितो
आनंदाने बहरूनी देतो सर्व कळ्यांना हासवितो

शत शत राशी प्राजक्ताच्या कृष्ण दावितो मांगल्य
आज गंधू द्या हसू द्या उद्या व्हायचे निर्माल् य

आज हासणे उद्या मलूलणे जीवन रीत जगायची
निर्माल्याला सरित्सागरी प्राप्त होतसे संगत विष्णू चरणाच ी

सुगंधी सुंदर जीवन देण्या रोज बहरती लाख कळ्या
निर्माल्यास्तव बघुनी कशाला खंत करावी मना खुळ्या.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

Show comments